नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम मोलगी परिसरात मोठ्याप्रमाणात पाळीव जनावरे अज्ञात आजारामुळे दगावत आहे. तरी मोलगी पशू वैद्यकीय अधिकारी तातडीने लक्ष देऊन उपयोजना करावी अशी मागणी पशु पालकांनी केली आहे.
मोलगी परिसरात पाळीव जनावरांना अज्ञात आजाराने आजारी पडत दगावत आहेत. त्यामुळे पशु धन विभागाने जनावरांची तपासणी करावी पशू वैद्यकीय अधिकारी यांनी घरो घरी जाऊन तातडीने लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. आता काही दिवसात खूपच जनावरे दगावली. लोकं दवाखान्यात येतात आणि तेथे पशुधन विकास अधिकारी अर्थात पशुवैद्यकीय अधिकारी भेट नाही.फक्त शिपाई इकडे तिकडे धावताना दिसतात. जबाबदारीने काम केले नाही ,आणि लोकांचे नुकसान झाले तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.दरम्यान जेकमसिंग वसावे यांचा बैल मृत झाला आहे.काही दिवसापूर्वी राज्य वसावे या गरीब शेतकरी चा बैल वारला.आणखीन काही जनावरे आजारी आहे.तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.