Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

team by team
March 23, 2022
in आरोग्य
0
१२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोना विरुध्दच्या लढ्यात प्रतिबंधात्मक लसीकरण हेच एकमेव महत्वपूर्ण शस्त्र ठरले आहे . कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी १२ ते १४ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरु करण्यात येत आहे . या अंतर्गत जिल्ह्यातील ६० हजार ८७१ अपेक्षित बालकांना प्रतिबंधात्मक लस जिल्हाधिकारी मनीषा खत्री , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिली जाणार आहे .
सद्यस्थितीत चीन आणि साउथ कोरिया या देशात कोरोनाचा उद्रेक वाढला असून भारतात चोैथ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे . जिल्ह्यात कोरोना सकारात्मक रुग्ण जरी कमी असली तरी कोविडच्या चौथ्या लाटेपासून लहान मुलांचे संरक्षण करणे गरजेचे आहे . म्हणून प्रत्येक पालकांनी ज्या मुलांचा जन्म १ जानेवारी २००८ ते १५ मार्च २०१० या कालावधीत झाला आहे अशी सर्व मुले लसीकरणासाठी पात्र राहणार आहेत त्यांचे लसीकरण करून घ्यावे . लसीकरण मोहिमेसाठी कोरोबवेक्स या लसीचे ६३ हजार ६०० डोस जिल्हा लस भांडार जिल्हा परिषद आरोग्य विभागास प्राप्त झाले आहे . जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकूण ७४ लसीकरण केंद्र कार्यरत असणार आहेत . १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना या लसीचे दोन डोस दिले जाणार आहेत व यासाठी पहिल्या डोस नंतर २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे . याबरोबरच ६० वर्ष व त्यावरील नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे . तरी सर्व १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींचे जास्तीत जास्त लसीकरण करून घेणे तसेच दुसर्‍या डोसचे प्रलंबित लाभार्थ्यांनी स्वतःचे लसीकरण पूर्ण करून लसीकरणाची गती वाढवावी असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

मोदलपाडा येथे २४ मार्च रोजी गेर डिंडन (याहा डिंडन ) नृत्याचे आयोजन,नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांचे आवाहन

Next Post

रोषमाळ बु येथे होळीनिमित्त आयोजीत विविध स्पर्धांच्या विजेत्यावंर साडेतीन लांखाचा बक्षिसांचा वर्षाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add