Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या दोन्ही नरामधमांना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

team by team
March 22, 2022
in क्राईम
0
नऊ वर्षीय बालीकेचा अज्ञाताने केला खून,पुरावा नष्ट करण्यासाठी शेतात झाडाच्या पाल्याखाली झाकले

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांब चेनवाई पाडा येथील ९ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करुन जिवे ठार मारणार्‍या दोन्ही नरामधमांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक करण्यात आली आहे.
सातपुडा पर्वत रांगात दर्‍या खोर्‍यात वसलेल्या छोट्या मोठ्या पाड्यांमध्ये आदिवासी बांधवाची हजारो वर्षाची परंपरा असलेली होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते . कामानिमीत्त किंवा नोकरीनिमीत्त बाहेर गावी गेलेले कुटुंबातील सर्व सदस्य होळीला घरी एकत्र येवून सण साजरा करीत असतात . सातपुडा पर्वत रांगेतील हुनाखांब चेनवाई पाडा येथील उदेसिंग गुलब्या वसावे व त्यांची पत्नी श्रीमती चमकाबाई गुलब्या वसावे हे दाम्पत्य त्यांच्या पाच मुली व एक मुलासह शेती करुन गुणागोविंदाने आपला राहात होते . परंतु यंदाची होळी या दाम्पत्याच्या सुखी संसारात विरंजन घालणारी ठरली . दि.१७ मार्च २०२२ रोजी हुनाखांबचा चेनवाईपाडा येथे देखील होळी होती .उदेसिंग वसावे व श्रीमती चमकाबाई वसावे यांनी त्यांच्या मुला बाळांना रात्रीचे जेवण खाऊ घालून झोपवले होते . उदेसिंग वसावे व श्रीमती चमकाबाई वसावे हे दाम्पत्य त्यांच्या पाड्यातील होळी बघण्यासाठी गेले होते . होळीचा सण पहाटे उशीरापर्यंत साजरा होत असल्याने श्रीमती चमकाबाई वसावे ह्या रात्री २ वाजच्या दरम्यान त्यांच्या घरी मुलांना पाहण्यासाठी गेले होते.मुले शांतपणे झोपलेले असल्याने ते पुन्हा त्यांच्या पाड्यातील होळीच्या ठिकाणी निघून गेले . थोड्या वेळाने या दाम्पत्यांची ५ वर्षाची व ३ वर्षाची अशा चिमुरड्या मुली या रडत रडत त्यांच्याजवळ आल्या म्हणून उदेसिंग वसावे व श्रीमती चमकाबाई वसावे हे घरी आले तेव्हा त्यांना त्यांचा ११ वर्षाचा मुलगा घरातील माळ्यावर झोपलेला दिसला परंतु त्यांची ९ वर्षाची एक मुलगी त्यांना घरात दिसली नाही . त्यांना वाटले की , त्यांची ९ वर्षाची मुलगी गावातील होळी पाहण्यासाठी गेली असेल बराच वेळ झाला परंतु मुलगी घरी आली नाही म्हणून आई वडिलांनी तिचा हुनाखांब व चेनवाईपाड्यात तसेच इतर नातेवाईकांकडे संपूर्ण दिवस व रात्रभर शोध घेतला तरी देखील तिचा कुठेच पत्ता लागत नव्हता . दि.१९ मार्च रोजी उदेसिंग वसावे व श्रीमती चमकाबाई वसावे हे मोकस येथे त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी जात असतांना त्यांच्या गावातील सिंगा रेवा वसावे या वृध्दाने त्यांना थांबवून सांगितले की , त्यांनी आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात महुचे फुले वेचत असतांना त्यांना महुच्या झाडाच्या पानांखाली एक लहान मुलगी पडलेली दिसली असे उदेसिंग वसावे यांना याबाबत सांगितले . म्हणून उदेसिंग वसावे हे सदर ठिकाणी खात्री करण्यासाठी गेले असता त्यांना त्यांची ९ वर्षाची मुलगी महुच्या झाडाच्या पानाखाली अर्ध नग्नावस्थेत पडलेली दिसली व तिने घातलेल्या फ्रॉकने तिचे तोंड झाकलेले होते . उदेसिंग वसावे यांनी तोंडावरील फ्रॉक बाजूला करून पाहिले असता तिचे नाका – तोंडातून रक्तस्त्राव होत होता व तिचे कपाळावर , डोळ्यावर व ओठावर गंभीर जखमा झालेल्या दिसत होत्या म्हणून उदेसिंग वसावे यांनी ही घटना तात्काळ गावकर्‍यांना सांगितली . गावकर्‍यांनी सदरची घटना मोलगी पोलीसांना कळविल्यानंतर मोलगी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली . घटनास्थळाची पाहणी करुन मोलगी पोलीस ठाण्याची सहा . पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी याबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळवून श्रीमती चमकबाई उदेसिंग वसावे यांच्या फिर्यादीवरून मोलगी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीताविरुध्द खून करून पुरावा नष्ट केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता व चिमुरडीचे प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविले . घडलेला प्रकार हा अत्यंत गंभीर व संवेदनशील होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक विजय पवार ,उप विभागीय पोलीस अधीकारी , शहादा अतिरीक्त कार्यभार अक्कलकुवा श्रीकांत घुमरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व अमंलदार मोलगी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक धनराज निळे तसेच मोलगी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस अमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्ष रविंद्र कळमकर व मोलगी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे पथक तयार करून आरोपी तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे मार्गदर्शन केले . घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , मोबाईल , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तु मिळुन आलेली नव्हती . ग्रामीण भाग असल्यामुळे सी.सी.टी.व्ही . चा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व मोलगी पोलीस ठाण्याच्या अमलदारांचे मिळून वेगवेगळे ६ पथके तयार करुन पथक तपासासाठी रवाना करण्यात आले . मयताचे इसमाचे मारेकरी कोण ? चिमुरडीला का मारण्यात आले ? मारण्याचा उद्देश काय ? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते . गुन्हा दाखल होवून दिवस लोटला होता परंतु आरोपी किंवा इतर कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती त्यामुळे अधिकारी मोलगी येथेच तळ ठोकून होते . दि.२० मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , हुनाखांबचा चेनवाईपाडा येथील एका दुकानदाराचे दुकानाच्या गल्ल्यातील १०० रुपये गुन्ह्यातील पिडीत मुलीने काढून घेतले होते म्हणून कदाचीत त्याने तिचा खून केलेला असावा परंतु १०० रुपये काढून घेतले म्हणून खून केला असावा हे न पटण्यासारखे होते . इकडे गुन्हा होवून २४ तासाच्या वर कालावधी इ आलेला होता परंतु पोलीसांच्या हाती काहीच लागत नव्हते म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी बातमीची खात्री करून बघू याउद्देशाने हुनाखांबचा चेनवाईपाडा येथील त्या दुकानदाराला ताब्यात घेवून चौकशी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हुनाखांबचा चेनवाईपाडा येथे जावून दुकानदाराची माहिती काढली असता तो घरी नसून त्यांच्या गावाच्या बाजुला असलेल्या जांगठी गावातील होळी पाहण्यासाठी गेला आहे असे समजुन आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता जांगठी येथील होळीत गेले असता तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे आरोपीतांच्या वर्णनाशिवाय इतर कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती त्यामुळे पथकाला आरोपीचा शोध घेण्यात अनेक अडचणी येत होत्या . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला जांगठी येथील होळीत नाचत असलेल्या एका घोळक्यात एक इसम दिसला त्या इसमाचे वर्णन मिळालेल्या वर्णनाप्रमाणे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या जवळ जाव नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव रवि दिल्या वसावे असे सांगितले , त्यास मोलगी पोलीस ठाणे येथे आणून विचारपुस केली असता त्याने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली.परंतु त्याच्याकडे सखोल विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा चेनवाई पाड्यातील मंगेश ऊर्फ मंग्याच्या मदतीने केला असल्याचे सांगितले . स्थानिक गुन्हे शाखेने मंग्याची चेनवाईपाडा येथे जावून माहिती घेतली असता तो सुरत गुजरात येथे काम करतो . तसेच होळी पाहण्यसाठी गावी आला होता. परंतु तो होळीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेला नसल्याबाबत माहिती मिळाली . मंग्या हा घरी नसुन तो गावात देखील दिसलेला नाही . मंगेश ऊर्फ मंग्याची अधिक माहिती घेतली असता तो त्याच्या शेतात लपून बसलेला असल्याची माहिती मिळाली म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ ते ६ कि.मी. डोंगर दर्‍यात पायपीट करत मंगेशचे शेत गाठले व अतिशय सावधपणे मंगेशच्या शेताच्या आजुबाजुला सापळा रचला , परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळू लागले परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत शिताफीने मंगेश यास ताब्यात घेवून नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव मंगेश ऊर्फ मंग्या गुलब्या वसावे (वय २१ ) रा . हुनाखांबचा चेनवाईपाडा ता . अक्कलकुवा असे सांगितले . ताब्यात घेण्यात आलेले रवि दिल्या बसावे(वय २१ ), मंगेश ऊर्फ मंग्या गुलब्या वसावे (वय २१ ) दोन्ही रा . हुनाखांबचा चेनवाईपाडा ता . अक्कलकुवा यांना गुन्ह्यातील पिडीत मुलीस जिवे ठार का मारले ? याबाबत विचारपुस केली असता त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी माहिती दिली . १८ मार्च रोजीच्या पहाटे २ ते ३ वा . सुमारास दोन्ही आरोपीतांनी गुन्ह्यातील पिडीत मुलीच्या घरी गेले ती झोपलेली असतांना रवि याने तिला घरातून बळजबरीने उचलून आणले तिच्या घराच्या समोरील शेतात तिच्यावर दोघांनी लैंगिक अत्याचार केला . त्यानंतर त्या चिमुरडीने झालेली घटना तिच्या आई – वडिलांना सांगेल असे दोघांना सांगितले , तेव्हा दोन्ही आरोपी घाबरले व त्यांनी त्या चिमुरडीला शेतात पडलेल्या दगडाने तोंडावर जबर मारहाण केली तसेच गळा दाबला त्यामुळे तो जागेवरच मरण पावली . त्यानंतर तिला उचलून त्या मुलीच्या घरासमोर थोड्या अंतरावर असलेल्या एका महुच्या झाडाखाली घेवून जावून महुच्या पानांच्या खाली झाकुन दिले अशा आशयाची माहिती दिली . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार ,उप विभागीय पोलीस अधीकारी , शहादा अतिरीक्त कार्यभार अक्कलकुवा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , मोलगी पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक धनराज निळे , स्थानिक गुन्हे शाखेचे सहा पोलीस निरीक्षक संदीप पाटील , असई अनिल गोसावी , पोलीस हवालदार मुकेश तावडे , सजन वाघ , दिपक गोरे , राकेश वसावे , पोलीस नाईक मनोज नाईक , सुनिल पाडवी , विशाल नागरे , जितेंद्र अहिरराव , दादाभाई मासुळ , मोहन ढमढेरे , पुरुषोत्तम सोनार , पोलीस शिपाई विजय ढिवरे , शोएब शेख , राजेंद्र काटके , अभिमन्यु गावीत , दिपक न्हावी , अभय राजपुत , तुषार पाटील , रमेश पाडवी , रमेश साळुंके यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

तऱ्हाडी येथे राष्ट्रीय सेवा योजनाविशेष श्रमसंस्कार शिबिराची सुरवात

Next Post

राजबर्डी बारीपाडा येथे पोलीसांनी छापा टाकत ३ लाख ६० हजार रुपयांचे स्पिरीट केले जप्त

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

राजबर्डी बारीपाडा येथे पोलीसांनी छापा टाकत ३ लाख ६० हजार रुपयांचे स्पिरीट केले जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add