तळोदा l प्रतिनिधी
शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी नंदूरबार तसेच तळोद्याच्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांची तालुक्यातील सोमावल येथे बैठक घेतली त्यात शेतकर्यांना आर्थीक नुकसानी पासुन वाचवण्यासाठी लोडशेडिंग ओव्हरलोड, विद्युत पुरवठा खंडित होणे या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणी करून विविध विषर्यांवर चर्चा करीत नवीन रोहित्र प्रस्ताव अधिकार्यांना सुपूर्त करण्यात आले.
शहादा-तळोदा मतदार संघाचे आ.राजेश पाडवी यांनी नंदूरबार तसेच तळोद्याच्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकार्यांची तालुक्यातील सोमावल येथील कलावती फार्महाऊस या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. यामध्ये शहादा- तळोदा मतदारसंघातील शेतकरीवर्ग मागील ५-६ वर्षापासून लोडशेडिंग ओव्हरलोड, विद्युत पुरवठा खंडित होणे या समस्येमुळे हैराण व त्रस्त झालेले असून सिंचन तसेच पाण्याअभावी त्यांच्या पिकांच्या उत्पादनात घट येत असून शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ सोसावी लागत आहे याबाबत आ. राजेश पाडवी यांना मतदारसंघात गावोगावी भेटीच्या वेळी असा एकही दिवस गेला नाही की शेतकर्यांनी त्यांना याबाबत निवेदन अथवा तक्रार केली नाही. मागील ३-४ महिन्यांपासून आ. राजेश पाडवी हे सतत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अधिकार्यांशी तसेच त्यांच्या वरिष्ठ पातळीवर हा विषय मांडत होते. तसेच शहादा व तळोदा तालुक्यातील शेतकरी जिथे ओवरलोड आहे व कृषी पंप फक्त २ ते ३ तास चालतात. त्या शेतकर्यांचे नवीन रोहित्र बसविण्याचे प्रस्ताव जमा करत होते.
याला अनुसरून कलावती फार्महाउस सोमावल बुद्रुक तालुका तळोदा येथे अधीक्षक अभियंता बोरसे मंडल कार्यालय महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित नंदुरबार,तसेच उपकार्यकारी अभियंता तिरुपती पाटील, तळोदा उपविभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी तळोदा यांच्यासोबत सखोल चर्चा करून पुढे काय उपाययोजना करता येतील याच्यावर विचार मंथन करण्यात आले. यात आमदार राजेश पाडवी यांच्याकडे जमा असलेले नवीन रोहित्र प्रस्ताव अधिकार्यांना सुपूर्त करण्यात आले.
आदिवासी बहुल शेतकर्यांच्या अडचणी विचारात घेता आज बैठकीत चर्चेअंती असे ठरले.कि दि. २५ रोजी सोमावल बुद्रुक ता.तळोदा येथे ग्रामपंचायत कार्यालयात विद्युत वितरण ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात यावे. या केंद्रात शेतकर्यांचे वीज बिल स्वीकारण्यात येतील. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने माहे सप्टेंबर २०१९ अखेर थकबाकी व ५० टक्के सूट जाहीर केलेली आहे. व एक ऑक्टोबर २०१९ नंतर चे आज पावेतो चे बिल हे १०० टक्के भरणे हे अनिवार्य आहे. या ग्राहक केंद्रात आलेल्या बिलाची रक्कम पैकी ३० टक्के रक्कम त्या गटातील वीज बिल अदा केलेल्या शेतकर्यांना नवीन रोहित्र व इतर आवश्यक दुरुस्ती देखभालीचा कामासाठी खर्च वापरण्यात येईल ही सवलत दि.३१ मार्च २०२२ पर्यंत असून त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आ.राजेश पाडवी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे. तसेच घरगुती वापरासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, ज्यांचे मीटर काढून नेले आहेत त्यांची थकबाकी विजेच्या बिलात व्याज व दंड माफ करून त्वरित नवीन कनेक्शन देण्यात येतील. या सवलतीचा घरगुती ग्राहकांनी फायदा घेऊन घरगुती कनेक्शन बाबत वीज वितरण कंपनीस सहकार्य करावे असे आ.राजेश पाडवी यांनी आवाहन केले आहे.








