नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा मयुर वाणी यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सक्षम महिला रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पुणे येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सक्षम महिला रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे खानदेशातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या संचालिका पूजा मयूर वाणी यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना सक्षम महिला पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पूजा वाणी या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम राबवित आहे. यासाठी त्यांचे पती मयूर वाणी व कुटुंबीयांची विशेष साथ लाभत आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा मानस असल्याने पूजा वाणी या माय चाइल्ड पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विविध प्रयोग राबवित व शैक्षणिक साहित्याचे वाटप करून गोरगरीब व मुलांना मदतीचा हात देत आहे. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची ही कार्य केले जात आहे. पुणे येथील शिवाजीनगरमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय सक्षम महिलारत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी नंदुरबारच्या पूजा मयूर वाणी यांचा राज्यस्तरीय सक्षम महिलारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी आमदार तथा साहित्यिक उल्हास पवार, मोहन जोशी, अभिनेत्री निशा परुळेकर, सविता जामनिक , ज्येष्ठ समाजसेविका कमलबाई परदेशी, सक्षम महिला रत्न पुरस्कार वितरणचे आयोजक विलास पाटील आदी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पूजा वाणी यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.








