Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तारापुर येथे होळी पाहायला गेलेल्या युवकाचा खुनाचा गुन्हा अवघ्या 4 तासात विसरवाडी पोलिसांना केला उघड, तिघांना अटक

team by team
March 21, 2022
in क्राईम
0
तारापूर येथे होळी बघायला गेलेल्या युवकाचा अज्ञाताने केला खून

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बिलदा येथील युवकाचा खुनाचा गुन्हा अवघ्या 4 तासात उघड करण्यात विसरवाडी पोलिसांना यश आले असून अनैतिक संबंधाच्या संशयातुन गावातील व्यक्तीनेच युवकाचा खुन केल्याचे उघड झाले.याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि . 20. मार्च 2022 रोजी तारापुर डुगली , ता . नवापुर येथील शेतशिवारात एक 30 वर्षीय युवकाचे प्रेत मिळुन आले . सदरची माहीती विसरवाडी पोलीस स्टेशन येथे मिळताच विसरवाडी पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहचुन मयत युवकाबद्दल माहीती काढली असता सदरचा मयत युवक हा बिलदा , ता . नवापुर येथील पराग सुरेश वळवी नामक असल्याचे समजले . सदर मयताच्या गळ्यावर व गुप्तांगावर जखमा असल्याने अनैतीक संबंधातुन गुन्हा घडला असल्याचा पोलीसांना अंदाज आला . गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेता नंदुरबार अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार , व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली . सदर बाबत मयताच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता . सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीसांनी घटनास्थळावरील परिस्थीतीजन्य पुरावा , तात्रीक पुरावा साक्षिदार व इतर बाबी तपासल्या असता सदर मयताचे घरासमोर राहणारे विनायक गुलामजी वळवी , मंगलदास उर्फ सावन विनायक वळवी व रमुबाई विनायक वळवी यांच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेवून विचारपुस केली . परंतु बराच वेळ चौकशी करुन देखील उपयुक्त माहीती त्यांच्याकडून मिळत नव्हती . त्याच दरम्यान पोलीसांनी एका महिलेस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तिचे चारित्र्याच्या संशयावरुन मंगलदास उर्फ सावन , सासरा विनायक वळवी व सासु रमुबाई वळवी यांनी मयत पराग वळवी यास मारल्याचे कबुल करुन रात्री घडलेला सर्व घटनाक्रम पोलीसांना दाखविला . सदर बाबत खात्रीशिर माहीती मिळाल्याने आरोपीतांना पोलीसी खाक्या दाखविताच आरोपीतांनी गुन्हा केल्याचे कबुल केले आहे . सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक पी . आर . पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नितीन एस . पाटील , पोउपनि भुषण व्ही . बैसाणे , पोहेकॉ नरेंद्र वळवी , पोहेकॉ दिनेश चित्ते , पोना राजु कोकणी , पोना अनिल राठोड , पोकॉ लिनेश पाडवी , पोकॉ अतुल पानपाटील , पोकॉ देवेंद्र हिरे , पोकॉ नितीन सोनवणे , पोकॉ दारासिंग पावरा , पोकॉ पिंटु पावरा , मपोकॉ गंगा तायडे तसेच स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोकॉ राजेंद्र काटके व पोना दादाभाई मासुळ यांनी केलेली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार अहिर सुवर्णकार समाजातर्फे विधायक उपक्रम ,मंगळ बाधा व दोष निर्मुलनासाठी अमळनेर येथे विनामूल्य सामूहिक अभिषेक पूजन

Next Post

जिल्ह्यातील सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांची गाठ जुळवूया! चला पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय होऊ या : जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add