म्हसावद l प्रतिनिधी
वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय राहून सामाजिक कार्य करणारे डॉ.प्रफुल्ल पाटील यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सामाजिक संस्थेत विविध पदांवर राहून आपले कर्तव्य चांगल्या रीतीने बजावत आहेत, तसेच वैद्यकीय क्षेत्रात ही सेवा देत आहेत, अश्या विविध सामाजिक कार्याची जाणीव ठेवत अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक पाटील व राष्ट्रीय महासचिव (संघटन) बच्चूसिंह बैंसला यांनी डॉ.प्रफुल्ल सुरेश पाटील यांना अखिल भारतीय युवा गुर्जर महासभा चे “राष्ट्रीय उपाध्यक्ष” म्हणून नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे.
बारडोली येथे आयोजित गुजर समाजाच्या स्नेहमीलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ नंदुरबारचे संचालक ॲड. प्रभाकर चौधरी, अखिल भारतीय गुर्जर महासभेचे गुजरात प्रदेश अध्यक्ष मोहन पटेल, कार्यकारी अध्यक्ष जगदीश पटेल, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. लतेश चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते
अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या उद्देश सफल करण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरून डॉ. प्रफुल्ल पाटील यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.