नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा-नंदुरबार रस्त्यावर वाहन अडवून वाहन मालकास हाताबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणी शहादा पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, किरण शंकर जाधव रा.शिरेगाव ता.नेवासा जि.अहमदनगर हे त्यांच्या मालकीच्या चारचाकी वाहनाने प्रकाशा-नंदुरबार रस्त्याने जात होते. यावेळी स्वप्निल भगीरत तुंवर व त्याच्यासोबत असलेल्या तीन इसमांनी लांबोळा गावापुढे त्यांचे वाहन अडविले. तसेच मद्यपान केल्याने कामावर हजर होवू दिले नाही याचा राग आल्याने किरण जाधव यांना हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत किरण जाधव यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात भादंवि कलम २९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.मेहेरसिंग वळवी करीत आहेत.