म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील धुरखेडा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालयात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्री मानवतेची शाश्वत शक्ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जे.एम.शेख होते. प्रमोद चव्हाण व सविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर अशा विविध ऐतिहासिक व्यक्तिरेखा सादर केल्या. सदर कार्यक्रमानिमित्त कल्पना पाटील, ज्योती पटेल व वृषाली सोनार यांनी फलक रेखांकन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चव्हाण यांनी केले तर ज्योती पटेल यांनी प्रस्तावना मांडली. जागतिक महिला दिनानिमित्त अलका चौधरी व बलवंत अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एकता सामुद्रे व श्वेता हयलिंगे या विद्यार्थिनींनी काव्यवाचन,गीतगायन सादर केले.अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक शेख यांनी स्त्रीशक्तीचे शिक्षण क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शोभा पाटील, दीपा पाटील, सुनील नाईक व प्रवीण पाटील यांचे सहकार्य लाभले.