नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील नवागाव येथे पाण्याची मोटार का बंद करतो या कारणावरुन दोघा भावांना लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील नवागाव येथील गणेश जितेंद्र पाडवी हे रोज पाण्याची मोटार का बंद करतो. या कारणावरुन सिमू बिंद्या वळवी, कांड्या बिंद्या वळवी रा.गोपाळपूर ता.तळोदा व त्यांच्यासोबत असलेल्या दोन जणांनी (नाव, गाव माहित नाही) अशा चौघा जणांनी गणेश पाडवी व त्यांचा भाऊ कांड्या वळवी यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. याबाबत गणेश पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात चौघा जणांविरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.विनोद नाईक करीत आहेत.