म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दूधखेडा येथील श्री.नागेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रमेश बिरारे हे होते.त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात केली.
यावेळी वर्गशिक्षक श्रीमती वैशाली देसले यांनी
शाळेला छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतीमा भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी शारदा पावरा यांनी केले.यावेळी विद्यार्थ्यांनी आपआपले अनुभव यावेळी कथन केले. तसेच मुख्याध्यापक रमेश बिरारे यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.तसेच शिक्षकांनी देखील यावेळी आपले मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसचलन शिक्षक महेंद्र चव्हान यांनी केले तर आभार विद्यार्थिनी ज्योती पवार हिने मानले.