नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे शाळा व्यवस्थापन समिती जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र राज्य ,पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळांमधील शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे प्रशिक्षण राज्यस्तर , जिल्हास्तर ,केंद्रस्तर याप्रमाणे आयोजन करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या प्रत्येकी दोन तज्ञ मार्गदर्शकांचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे संपन्न झाले . यावेळी जिल्ह्याचे नूतन प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी आवाहन केले की, जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळेत येऊन शाळेच्या सहभागासाठी , आवश्यक त्या बाबींवर चर्चेसाठी व शालेय गुणवत्ता विकासासाठी आवश्यक असतो, त्यासाठी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे विविध माध्यमातून संपर्क करून शालेय कामकाजाशी जोडणी केली पाहिजे . शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांशी चांगल्याप्रकारे संपर्क ठेवून कामकाज केल्यास शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी मोलाची मदत होत असते . जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग समन्वयाने विविध उपक्रम व कार्यक्रम राबवणार असून जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांनी व्यक्त केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.जगराम भटकर यांनी NEP 2020 व निपुण भारत अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती महत्वपूर्ण बाब असून हा गुणवत्ता विकासाचा दुवा आहे . त्यासाठी सर्वांनी हे प्रशिक्षण केंद्र स्तर व शाळास्तरापर्यंत संपूर्ण माहितीसह व्यवस्थित रित्या पोहोचविणे आवश्यक आहे यातून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचे सक्षमीकरण होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊ शकेल .यावेळी नूतन शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांचा सत्कार डायट नंदुरबार मार्फत करण्यात आला.सदर कार्यक्रमास वरिष्ठ अधिव्याख्याता प्रवीण चव्हाण ,रमेश चौधरी, अधिव्याख्याता डॉ. संदीप मुळे , सुभाष वसावे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वयक तथा अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी केले.प्रशिक्षण यशस्वीतेसाठी साधन व्यक्ती तानाजी वळवी व ज्ञानप्रकाश फाऊंडेशनच्या श्रीमती सोनल शिंदे व रविकांत ढाकरे यांनी परिश्रम घेत आहेत.