नंदूरबार l प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भालेर येथील श्रीमती क. पू. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या संचालिका तथा माजी सरपंच सौ. बेबीताई भास्करराव पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण नंदूरबार येथील सौ .सविता धनराज धनगर, श्रीमती आर. एम.मराठे, श्रीमती डी.बी.चव्हाण, प्राचार्या सौ. विद्या चव्हाण,
पर्यवेक्षक ए.व्ही. कुवर यांनी कर्तबगार महिलांच्या प्रतिमेचे पूजन केले पुष्पहार अर्पण केला.
कार्यक्रमास आलेल्या तसेच विद्यालयातील सर्व महिलांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
सर्वांनी कर्तबगार महिलांवर मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील विद्यार्थिनींनी कर्तबगार महिलांची वेशभूषा केली होती तसेच विद्यार्थिनींनी कर्तबगार महिलांवर मनोगत व्यक्त केले व विविध कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमास सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.