म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या चार महिला खेळाडूंची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थिनी मितल माळी, आरती आहिरे, आकांक्षा पाटीदार, वैष्णवी सूर्यवंशी या चार महिला खेळाडूंची दिनबंधू छोटूराम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ मुर्थल, सोनीपत, हरियाणा येथे दि. १० ते १४ मार्च २०२२ दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल महिला स्पर्धेकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या संघात निवड झाली आहे.
या खेळाडूंना प्रशिक्षण व मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक अरविंद कांबळे यांनी केले.
या यशस्वी निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, संस्थेचे समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य आर. एस. पाटील, उपप्राचार्य एम. के. पटेल, उपप्राचार्य एस. डी. सिंदखेडकर, क्रीडा मंडळाचे संयोजक आय. जे. पाटील, ए. एच. जोबनपुत्रा, वर्षा चौधरी, जी. एस. गवई, प्रा. महेश जगताप, प्रा. खुमानसिंग वळवी, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक अरविंद कांबळे यांनी राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन आणि कौतुक केले आहे.