नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा ते प्रकाशा रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन कारवाई केल्याच्या राग आल्याने तलाठ्यास मारहाण करीत ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा ते प्रकाशा रस्त्यावरील मनीष पेट्रोल पंपाजवळ काल दि. ८ मार्च रोजी सकाळी १०. १५ वाजेच्या सुमारास शहादा येथील बाला उर्फ कपिल प्रकाश माळीच याने त्यांच्या ताब्यातील विना नंबरच्या ट्रॅक्टर मधून अवैध गौण खनिज वाहतूक करत होते त्या ठिकाणी तलाठी पंकज सुधाकर पवार यांनी सदरचे ट्रॅक्टर अडवून कारवाईसाठी ताब्यात घेतले. सदर ट्रॅक्टर तहसिल कार्यालयात घेवुन जात असतांना शहादा प्रकाशा रस्त्यावरील मनीष पेट्रोल पंपाजवळ पंकज सुधाकर पवार यांनी ट्रॅक्टर अडविले तलाठी पंकज सुधाकर पवार यांना पाठीवर पोटावर आता हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच अर्वाच्य शिवीगाळ करून दमदाटी केली.या ठिकाणाहुन उत्तम नारायण भिल याने सदरचे वाहन घेऊन निघून गेला म्हणुन शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तलाठी पंकज सुधाकर पवार रा.गांधी नगर,शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलस ठाण्यात बाला उर्फ कपिल प्रकाश माळीच रा.लक्ष्मीनगर, शहादा, बाला (पुर्ण नाव महित नाही), उत्तम नारायण भिल रा.तिखोरा, ता.शहादा या तिघा विरूध्द भादवी ३५३, ३३२, २९४, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आरक करीत आहेत.