नंदुरबार l प्रतिनिधी
कुपोषीत बालकांच्या पालकांना मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध करण्या संदर्भात रोजगार हमी योजना कार्यालय व युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला उपजिल्हाधिकारी (रोहयो ) शाहुराज मोरे, युनिसेफचे राज्य सल्लागार डॉ. गोपाळ पंडगे, नितीन वसईकर, पी.डी. सुदामे, आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत युनिसेफचे डॉ.पंडगे यांनी ‘कुपोषण’ या विषयावर सखोल माहिती दिली. तसेच युनिसेफचे पी.डी. सुदामे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये कुपोषित बालकांच्या पालकांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना दिल्या. तसेच अंगणवाड्या व शाळांच्या परिसरात शेवंगा, लिंबू, आवळा इत्यादी झाडांची लागवड करण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील विविध एनजीओचे प्रतिनिधी, डीएससीचे प्रतिनिधी, सहायक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी, ग्रामरोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.