नवापूर l प्रतिनिधी
नवापूर नगर परीषद मधील आपत्ती व्यवस्थापन विभागाची चौकशी करुन दोषींवर कडक कार्यवाही करणे बाबतचे निवेदन नवापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले.भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांचा संपर्क कार्यालयातुन चालत नगरपालिकेचा विरोधात घोषना बाजी करत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,नवापूर शहरातील मध्यभागी व गजबलेल्या परीसरातील लाईट बाजार येथे घंटीवाला या नावाने ओळखली जाणारी पीठाच्या गिरणीत दि. ५ मार्च रोजी मध्य रात्रीच्या १२.०० ते १२.३० वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली त्यामुळे १ वाजेपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केल्याने प्राथमिक स्वरुपात मनुष्यबळाने पाणी टाकुन आग विझविण पुर्णपणे अश्यक्य झाले होते. त्यामुळे पिठ गिरणीचे मालक अब्दुला बदुडा
यांनी तातडीने स्वत: नगराध्यक्ष, नगरपालिका कार्यालय, अग्निशमन विभाग यांच्याशी संपर्क
साधला परंतु त्वरीत मदत प्राप्त न झाल्याने नवापूर पोलीस प्रशासनाने तातडीने लगतच्या
गुजरात राज्यात सोनगढ, व्यारा इ. दुरध्वीव्दारे संपर्क केले असता व्यारा नगरपालिकेचा
अग्निशमन दलाचा आधुनिक बंब २ वाजेच्या सुमारास आल्याने परीस्थिती नियंत्रणात
आली.परंतु स्थानिक शहरासाठी उपलब्ध असलेला नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा
बंब हाकेच्या अंतरावर असुन देखील केवळ नगरपालिकेच्या भोंगळ कार्यप्रणालीमुळे तातडीने
उपलब्ध न झाल्याने बदुडा यांच्या पिठाची गिरणीचे जवळपास १२ ते १३ लक्ष रुपयांचे न भरुन
येणारे नुकसान झालेले आहे, दिड महिन्यापुर्वीच नवापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील विजय इलॅकट्रॉनिक दुकानास आग लागली होती त्यावेळेस देखील नगरपालिकेचा अग्निशमन दलाचा बंब उपलब्ध न झाल्याने मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यास नवापूर नगरपालिका प्रशासन व नगरपालिकेवर निवडुन आलेले लोकप्रतिनिधी हेच
जबाबदार आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनांची खालीलप्रमाणे मुद्यांवर चौकशी करुन योग्य ती
कार्यवाही करावी.
१. फायर स्टेशन- नवापूर अग्निशमन विभागाची प्रशासकीय इमारत प्रणालीचे ऑडीट त्वरीत
करण्यात यावे.
२. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाचे आणि बिनतारी व दुरध्वनी साधनांची व दुरध्वनी
क्रमांक सार्वजनिक आहे किंवा कसे तसेच आणिबाणिच्या प्रसंगात तात्काळ व सुयोग्य
प्रतिसादासाठी दळणवळाणाचे नियोजन आहे किंवा कसे .३. अग्निशमन कक्षात परिरीक्षीत करण्यात आलेल्या नोंदवहयामध्ये सर्व घटनांच्या नोंदी योग्य
क्रमाने व योग्य पध्दतीने करीत आहे किंवा कसे तसेच नियंत्रण कक्षातील कर्मचारी याच्या
पाठपुरावा करीत आहेत किंवा कसे .
४. नवापूर शहरात कोणतील आपतकालीन घटना घडल्यास सावधगिरी बाळगणेसाठी नवापूर
नगरपालिकेत अलार्म लावण्यात आहेत कि नाहीत ते त्वरीत सुरु करण्यात यावे.
५. अग्निशमन वाहनावर अग्निसिलेंडर नसल्याने आग विझविणेसाठी विलंब होतो याची
देखील चौकशी करावी.
६. नवापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव आधुनिक व सुसज्ज दर्जाचे
अग्निशमन बंब मागविण्यात यावे . अग्निशन बंबावर प्रशिक्षीत कर्मचारी २४ तास उपलब्ध
करण्यात यावेत.
७. नगरपालिकेच्या नियमानुसार नवापूर नगरपालिका मालमत्ता धारकांकडुन अग्निशमन कर
दरवर्षी वसुल करीत असते त्यानुसार झालेल्या नुकसानीची भरपाई देखील पालिके
प्रशासनाकडुन दिली गेली पाहिजे व तशी तरतुद देखील शासनाच्या केली पाहिजे.
वरील प्रमाणे मागण्यांची व दुदैर्वी घटनेची तातडीने प्रशासकीय चौकशी करुन नुकसान भरपाई अदा करावी व दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी.असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर भाजपचे तालुका अध्यक्ष भरत गावीत,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,जाकीर पठाण,जयंतीलाल अग्रवाल,अजय गावीत,दिनेश चौधरी,शहर अध्यक्ष प्रणव सोनार,कमलेश छञीवाला,सप्नील मिस्ञी सह भाजपचा पदधिकारी यांचा सह्या आहेत.