नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश उर्फ विक्की किशोर पाटील हे विजयी झाले असून लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत त्यांना ८ हजार ८४७ मते मिळाली आहेत
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली वुइथ इंडियन युथ काँग्रेस या मोबाईल ॲप द्वारे ऑनलाइन मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत जिल्ह्यातील युवकांनी उस्फूर्तपणे मतदान केले. युवक काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणी सोबतच ऑनलाइन निवडणुकीसाठी दि. 12 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2019 या कालावधीत मतदान झाले होते. 7 मार्च रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील निलेश उर्फ विकी किशोर पाटील हे नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विजयी झाले.नंदुरबार जिल्हा युवक काँग्रेसच्या “जिल्हाध्यक्षपदी” निलेश उर्फ विक्की पाटील यांची निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन जिल्हा परिषद सदस्या हेमलता शितोळे-पाटील, अथर्व एजन्सीजचे संचालक शशिकांत पाटील यांनी केले.यावेळी नगरसेवक रियाज कुरेशी, आरिफ शहा, आरिफ पिंजारी ,काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस एन.डी.पाटील, पत्रकार नरेंद्र बागले आदी उपस्थित होते.