नंदूरबार l प्रतिनिधी
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार येथील एस. एम. ट्रस्ट संचलित एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील , सौ रचना पी. पाटील, डॉ. प्रीती ठाकरे (समुपदेशक) उपनगर पोलीस स्टेशनचे पीआय श्री.भदाने , उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, जुनिअर कॉलेज चे पर्यवेक्षक सि.पी. बोरसे, ज्येष्ठ शिक्षक ए.आर. गर्गे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक सादर करताना सुनीता शिंदे म्हणाल्या की, शाळेतील जेंट्स टीचर यांनी या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील साहेब व सौ. रचना पाटील यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉ.प्रीती ठाकरे यांचाही सत्कार पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्यां चा स्वागता करीता “बेटी हू मै बेटी मै तारा बनूंगी” हे सुंदर गीत गायन करण्यात आले त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते “सुखदा” या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले व महिला दिनानिमित्त सूंदर आकर्षक केक कापण्यात आला, ह्या वेळी मान्यवरांच्या हस्ते
मिस एस.ए.मिशन आर्टिस्ट रोशनी पवार, दिव्या निरंजन वसईकर, मिस एस.ए.मिशन स्कॉलर प्रिया वासवानी, अलिना पराईल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी दुहेरी यश प्राप्त करत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण मुंबई विभागामार्फत घेतलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक 50 हजाराचे पारितोषिक मिळवून त्रिपुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरिता या दोघांची निवड झाली असून या दोघांचेही सत्कार पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार करण्यात आले व निलाक्षी मिश्रा व स्वाती पावरा या विद्यार्थिनींचा मिस एस.ए.मिशन ऑलराऊंडर म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील म्हणाले की, “महिला दिन फक्त महिला दिना पुरताच साजरा केला जाऊ नये, तर विद्यार्थीना व पुरुषांना, त्यांनी आयुष्यभर महिलांचा सन्मान कसा केला पाहिजे व अटीट्युड कसा असला पाहिजे, कसा आदर ठेवला पाहिजे याचे शिक्षण व मार्गदर्शन अशा कार्यक्रमातून देण्यात यावे”. यावेळी डॉ. प्रीती ठाकरे यांनी आपल्या मनोगतात असे म्हटले की, “महिला दिन साजरा करणे हे फक्त 8 मार्च पर्यंतच मर्यादित न ठेवता वर्षभर साजरा केला पाहिजे.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये पेन विद्यार्थ्यां मार्फत आत्तापर्यंत “विविध क्षेत्रांमध्ये कार्य करत असणाऱ्या स्त्रियांच्या वेषभूषा परिधान करण्यात आल्या होत्या हे या कार्यक्रमाचं आकर्षण ठरले” ह्या वेळेस विद्यार्थ्यांनी फॅशन शो, डान्स,रॅप वॉल्क अशा पद्धतीचे इव्हेंट सादर केले.सदर कार्यक्रमाच्या वेळेस प्राचार्य सौ.नुतनवर्षा वळवी यांनी सर्व स्त्री शिक्षकांचा “मी महिला असल्याचा अभिमान आहे” या नावाचा स्लॅश शाळेतील सर्व स्त्री शिक्षकांना परिधान करवून त्यांचा सत्कार केला.यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व मुख्याध्यापक व्ही. आर.पवार यांनी केले तर शाळेच्या शिक्षिका ललिता पाटील, उर्मिला मोरे, डॉ.गायत्री पाटील, विद्या सोनवणे, अपर्णा पाटील, मनीष पाडवी, प्रसाद दीक्षित, किरण पाटील, रोहन पाडवी, खुशाल शर्मा, रत्नदीप साळवे, स्वप्निल अहिरे यांनी परिश्रम घेतले.