Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या सुकन्येचा दक्षिण आफ्रिकेतही सेवाभाव

Mahesh Patil by Mahesh Patil
July 27, 2021
in सामाजिक
0
नंदुरबारच्या सुकन्येचा दक्षिण आफ्रिकेतही सेवाभाव

नंदुरबार ! प्रतिनिधी

भारतीय महिलांच्या सहकार्याने मूळच्या नंदुरबार येथील पूर्वाजंली जोशी यांनी दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाग्रस्त कुटुंबांची क्षुधा भागविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. पूर्वाजंली जोशी या   नंदुरबार  मर्चंट बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास पाठक यांच्या  सुकन्या आहेत. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भारतीयांच्या सेवा वृत्तीला जगात तोड नाही असं बोलले जातं. व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने जगाच्या पाठीवर कुठेही भारतीय माणूस गेला तरी भारतीय वसुधैव कुटुम्बकम या संकल्पनेतून सेवा कार्यासाठी नेहमीच तत्पर असतात. सध्या दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तीव्रता वाढली असून कडक लॉकडॉउन सुरू आहे. या काळात राजधानी जोहान्सबर्गमध्ये कोरोना बाधित व्यक्तींच्या कुटुंबांना बाहेर पडणे कठीण असताना त्यांच्यासाठी घरपोहोच भोजनाची निशुल्क सेवा पुरविण्याची सामाजिक जबाबदारी ही भारतीय महिलांनी स्वीकारली आहे. पंधरा जणांच्या या टींमध्ये पाच महिला समन्वयक असून नंदुरबार येथील पूर्वाजंली जोशी या नेतृत्व करीत आहेत. नंदुरबार माहेर आणि धुळे सासर असलेल्या पूर्वाजंली जोशी या पती प्रशांत जोशी ग्राम पत्ते मुलगा व मुलगी यांच्यासोबत जोहान्सबर्गमध्ये सध्या वास्तव्यास आहेत. महिन्याभरापूर्वी पूर्वाजंली जोशी यांनी त्यांच्या घरा शेजारील दोन कोरोना ग्रस्त कुटुंबांचे भोजनाची पार्सल पुरवणे पासून या सेवेला प्रारंभ केला. या उपक्रमात रुग्ण असलेल्या कुटुंबास घरपोच एक वेळचे भोजन पुरवली जात आहे. त्यात वरण, भात, पोळ्या, भाजी, सलाड, फळ, विशेषता विटामिन सी चे संत्री-मोसंबी, ग्रीन टी चे पाकीट दिले जात आहे. लॉकडॉउनमुळे रात्रीचे जेवण वितरित करणे शक्य नसल्याने दुपारच्या जेवणात थोडे जास्तीचे पदार्थ देण्यात येत आहे.  दररोज २०० पाकिटांची व्यवस्था या उपक्रमात भारतीय महिलांनी गरजु कुटुंबांकडून मागणी वाढल्याने महिन्याभरापासून ही सेवा सुरु केली आहे यात दररोज २०० पाकीट घरपोच पोहोचविल्या जात आहेत. केवळ भारतीय कुटुंब नव्हे तर दक्षिण आफ्रिका व अन्य देशांमधील कुटुंबियांसाठी ही सेवा महिला पुरवीत आहेत. भारतीयांच्या विविध उपक्रम कार्यक्रमांची या ठिकाणी इंडिया क्लब म्हणून ओळख आहे. या सेवा कार्याची माहिती झाल्यानंतरच लगेच त्यांना मदतीचा हात दिला. पूर्वाजंली जोशी यांच्यासोबत प्राची गुप्ता, रश्मी हरिपाठ, हर्षदा सिद्धपूर, स्मृती त्रिवेणी, निशी, ज्योती, शिना व टिना आदी महिला या सेवा कार्यात योगदान देत आहेत. यामुळे त्यांच्या सेवाकार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रकाशा येथे भाजपाच्या युवा वॉंरीअर्स अभिनायानाचे फलक अनावरण

Next Post

कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

Next Post
कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

कोरोना नियमांचे पालन करत जागतिक आदिवासी दिन साजरा होणार शहादा येथे बैठकीत आदिवासी एकता परिषदेच्या वतीने करण्यात आले जाहिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

नंदुरबार शहरात लवकरच सिटी बस सुरू होणार

July 1, 2025
छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

छायाचित्र व्यवसायात नावाजलेले व्यक्तिमत्व कै.रामभाऊ पाटील

July 1, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group