नंदुरबार ! प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प शहादा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित महसुली गावातील इच्छूक व पात्र महिला उमेदवारांकडून 10 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.
धांद्रे बु, टेंभली-1, बोराळा-1, बामखेडा-1,जयनगर-2,अनरद-1 येथील अंगणवाडी केंद्रातील 6 अंगणवाडी सेविका रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
तसेच धांद्रे खु, पुसनद-1, खापरखेडा-1, बोराळा-1, बामखेडा-1, मोहिदा, कहाटुळ-1, कहाटुळ-2, कहाटुळ-4, डोंगरगाव-5, डोंगरगाव -3, लोणखेडा-5, जयनगर-3, कोठली-3, हिंगणी, अनरद-1, नांदर्डे, कर्जोत-1, पिंपर्डे-1, लोहारा, न्यु असलोद-1, असलोद, टेंभा-1, कुकावल-1, काकर्दे खुर्द, अंगणवाडी केंद्रातील मदतनीस या 25 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी केवळ त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज व शैक्षणिक पात्रता व इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, शहादा पंचायत समिती ता.शहादा येथे संपर्क साधावा.