नंदुरबार | प्रतिनिधी-
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून, खेड व इतर तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती आली आहे. त्याला मदत म्हणून नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना ५१ हजाराचा धनादेश देण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळून, खेड व इतर तालुक्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात वित्तहानी व नागरीकांचे मालमत्ते नुकसान झाले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने रत्नागिरी रिलीफंडमध्ये आर्थिक मदत म्हणून ५१ हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदिप परदेशी, उपाध्यक्ष महेंद्र कदमबांडे, कार्याध्यक्ष मिलींद निकम, सरचिटणीस मुकेश चव्हाण, सल्लागार बहादुरसिंग पावरा, जुबेर पठाण, हेमंत देवकर, रमेश वळवी, भिमराव बोरसे, तुषार साळुंखे, आर.एस.चौधरी, हिरालाल घुले, दिलीप पाडवी, गोकुळ पाटील, महारू पाटील, स्वप्निल मुळे, ओम कुलकर्णी आदी उपस्थित होते.