Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुक्कुट व्यावसायिकांनी जैव सुरक्षा उपाययोजनांचे पालन करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
February 24, 2022
in आरोग्य
0
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू रोगाच्या प्रादुर्भाव तपासणीचे निष्कर्ष पॉझिटिव्ह आले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील पशुपालक, कुक्कूटपालन व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी जैवसुरक्षा उपाययोजनेचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
पोल्ट्री फार्ममध्ये कामकाज करणाऱ्या व्यक्तींनीच पोल्ट्रीफार्म मध्ये प्रवेश करावा. इतर कोणत्याही व्यक्तींना फार्ममध्ये जाण्यास प्रतिबंध करावा. बाहेरील कोणतेही पक्षी, प्राण्यांना पोल्ट्री फार्ममध्ये ठेवू नये. पोल्ट्रीफार्ममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे बूट, कपड्यांसह हातपाय पोल्ट्रीफार्म मध्ये जाण्याअगोदर व बाहेर आल्यानंतर जंतूनाशकाचा वापर करुन स्वच्छ करावेत. अनुषंगीक साहित्य, वस्तू व पक्षी इतर फार्म मधून आणायचे किंवा पाठवायचे असल्यास जंतूनाशकाचा वापर करुन स्वच्छ करावेत.
पोल्ट्रीफार्म मधील पक्ष्यांचे पिंजरे नेहमी स्वच्छ ठेवावेत. पक्ष्यांचे खाद्य व पाणी दररोज बदलावे. सद्य:स्थितीत असलेल्या पक्ष्यांमध्ये नवीन पक्ष्यांचा समावेश लगेच करु नये, नवीन आणलेल्या पक्ष्यांना कमीत कमी 30 दिवस वेगळे ठेवावे. बर्ड फ्लू रोग सदृश्य लक्षणांचे पोल्ट्रीधारकांनी निरीक्षण करावे, ज्यामध्ये पक्ष्यांच्या डोळ्यांच्या आजूबाजूस, मान, डोके सुजलेले, नाकातून स्त्राव, तुरा, कोंब व पायाच्या रंगात बदल होणे, अंडी उत्पादनात घट, अचानक कमकुवतपणा येणे, पंख खाली पडणे, हालचाल कमी होणे इत्यादी लक्षणे आढळल्यास रोग सदृश्य पक्षांची माहिती त्वरीत जवळील पशुवैद्यकीय संस्थांना द्यावी.
पोल्ट्रीफार्म धारकांनी पक्ष्यांची वर्गवारी वयानुसार करणाऱ्या प्रणालीचा अवलंब करावा, ज्यामध्ये एकाच वयाचे पक्षी एकावेळी आणणे व काढणे या पध्दतीचा अवलंब करावा. एका पोल्ट्रीफार्म मधून दुसऱ्या पोल्ट्रीफार्म मध्ये जाणे टाळावे, जर जाणे गरजेचे असेल तर संबंधीतांचे बुट व कपडे जंतूनाशकांनी स्वच्छ करावेत.
परिसातील कुक्कुट पालकांनी जैवसुरक्षा प्रणालीसाठी पुढील बाबींचा अवलंब करावा

कुक्कुट पालकांनी आपले पक्षी बंदिस्त ठेवावेत, इतर वन्यपक्षी व शेजाऱ्यांच्या पक्ष्यांच्या संपर्कात आपल्या पक्षांचा संपर्क येऊ देऊ नये. पक्ष्यांची जागा व परिसर नियमित स्वच्छ ठेवावा. पक्ष्यांची विष्ठा व कचऱ्याची विल्हेवाट दररोज जाळून किंवा पुरुन टाकावी, बाहेरील इतर वन्यपक्षी व बाहेरील पक्ष्यांना आणू नये. मृत पक्ष्यांना उघड्यावर न टाकता त्याची विल्हेवाट व्यवस्थीत पुरुन करावी. आजारी, मृत पक्ष्यांची माहिती जवळील पशुवैद्यकीय दवाखान्यात द्यावी.

बाजारपेठेत जैवसुरक्षा प्रणालीचा अवलंब करण्यासाठी पुढील बाबींचा अवलंब करावा

बाजारपेठेत पक्ष्यांना हाताळणारे व त्यांची कत्तल करणाऱ्या व्यक्तींनी हातात ग्लोज व तोंडावर मास्कचा वापर करावा. जीवंत पक्ष्यांच्या बाजारपेठेच्या जागेचे दररोज निर्जंतुकीकरण करावे. आजारी, मृत पक्ष्यांची काळजी व खबरदारी घ्यावी. कुक्कुट पक्ष्यांचे मांस विक्रीची जागा स्वच्छ ठेवावी. या ठिकाणी साठविण्यात येणारे शरीरातील अवयव, पंख इत्यादीचे विल्हेवाट करतांना आवश्यक दक्षता घ्यावी. बाजारपेठेच्या ठिकाणी गटार व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करावी. पक्षी ठेवण्याचे पिंजरे दररोज स्वच्छ करावेत. अशा ठिकाणी पायदान, फवारणी, हाथ धुणे व इतर स्वच्छतेची व्यवस्था करावी. शासकीय यंत्रणेने अशा ठिकाणाची नियमित तपासणी करावी. पशूपालक, कुक्कुटपालन व्यवसायिक, व्यापारी, दुकानदार व नागरिकांनी वरील प्रमाणे जैवसुरक्षा नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही श्रीमती खत्री यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अखेर मिळाले : नंदुरबार जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती

Next Post

म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

Next Post
म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

म्हसावद येथील सर्पमित्र सुधाकर पाटील यांना सर्पतज्ञ निलिमकुमार खैरे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add