Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी न करणार्‍या शैक्षणिक संस्थांवर कारवाईची शिवसेनेची मागणी

team by team
February 22, 2022
in राजकीय
0
महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी न करणार्‍या शैक्षणिक संस्थांवर कारवाईची शिवसेनेची मागणी

शहादा l प्रतिनिधी
महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी न करणार्‍या शैक्षणिक संस्था व इतर संस्थांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी व कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी डॉ.चेतनसिंग गिरासे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रांताधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाच्या आशय असा : प्रत्येक शासकीय कार्यालय व शिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रपुरुशांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात यावी याबाबतचे आदेश राज्य शासनाने काढले असून या आदेशाचे पालन करावे अशा सूचनाही दिल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. राष्ट्रपुरुष हे देशाची संपत्ती असून त्यांचे काम, कार्य विद्यार्थ्यांना माहीत व्हावे, त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शासनाने राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
शहरातील एस. ए. मिशन या संस्थेमध्ये राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी कधीही साजरी केली जात नाही. या संस्थेमार्फत राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने तसेच संबंधित संस्थाचालक जाणीवपूर्वक राष्ट्रपुरुषांच्या अवमान करीत असल्याने याची चौकशी करण्यात येऊन संस्था चालकासह जबाबदार दोषींवर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे यापुढील सर्व राष्ट्रपुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा करण्याचे आपण आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, तालुकाप्रमुख राजेंद्र लोहार,, डॉ. सागर पाटील, दिलीप पाटील, मुरलीधर वळवी, इंद्रिस मेमन, लिलाचंद सोळंकी, गणेश चित्रकथे, बापू चौधरी,भगवान अलकरी आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Next Post

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेसाठी लाखोंची पारितोषिके

Next Post
राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेसाठी लाखोंची पारितोषिके

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेसाठी लाखोंची पारितोषिके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add