नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथील शेतकर्याने बॅकेचे कर्जाला कंटाळुन फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.दरम्यान उपचारा दरम्यान जिल्हा रूग्णालयात आज मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील तलवाडे खुर्दे येथे राहणार्या नाना नवल कोळी (पवार)(वय ६९) यांच्या शेतात दोन वर्षांपासुन नुकसान होत आहे.त्यांनी महाराष्ट्र ग्रामिण बँकेतुन दिड लाखाचे कर्ज घेतले होते.सततच्या नापीकीला व बॅकेचे कर्जाला कंटाळुन आज दि.२० फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतात फवारणीचे औषध पिवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा लक्ष्मन नाना कोळी हे शेतात गेले असता त्यांना सदरची घटना लक्षात आली.त्यांनी मित्रांच्या सहाय्याने नाना नवल कोळी यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र दुपारी १२.५८ वाजेच्या दरम्यान त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.याबाबतची माहिती डॉ.दिपक डिसुजा यांनी जाहीर केले. याप्रकरणी लक्ष्मन नाना कोळी रा.तलवाडे खुर्दे ता.नंदुरबार यांच्या खबरी वरून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान तलवाडे खुर्दे ता.नंदुरबार या गावातील ६ महिन्यात आत्महत्येची ही पाचवी घटना आहे.