नंदुरबार l प्रतिनिधी
येथील माळीवाडा परिसरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीमंतयोगी विचाराचे महामेरू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी झाशी येथील पंचअग्नी आखाडा महामंत्री सोमेश्वरनंदजी बाबाजी ब्रह्मचारी यांच्या हस्ते शिव पूजन करण्यात आले. स्वामींनी शिवाजी महाराजांची गाथा व आजच्या तरुण व्यसनापासून मुक्त व्हावा, व्यसनापासून लांब राहाल तरच आपला देश व आपला तरुण प्रगती करेल, असे सांगितले. नगरसेवक जगन माळी यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे संघटन व नेतृत्व याबद्दल माहिती दिली. माजी आरोग्य सभापती मोहन माळी यांनी माळी समाज कुठल्याही पक्षात असो, पण सामाजिक संघटनेत एक व्हावा. एकजुटीने कार्य करावे, तसं संघटित रहावे व महाराजांच्या विचारला घेऊन समाज सुधारण्यासाठी प्रत्येक तरुणाने पुढे यावे, असे आवाहन केले. अविनाश पाटील म्हणाले की, होता जीवा म्हणून वाचला शिवा या विषयावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजी मार्केट कमिटीचे अध्यक्ष विजय माळी, माळी समाज कार्यकर्ते रमेश महाजन, कैलास माळी, लक्ष्मण माळी, बाबुलाल माळी, संभाजी माळी, दत्तात्रय माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक मनोज गायकवाड प्रास्ताविकेत म्हणाले की, महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली. महात्मा फुलेंमुळेच शिवाजी महाराजांचे चरित्र व स्वराज्य याची माहिती आपल्यापर्यंत पोहचली. म्हणूनच आज आपण शिवजयंती साजरी करीत आहोत. सुत्रसंचलन जीवन माळी यांनी केले. तर आभार हरीश माळी यांनी मानले. कार्यक्रमाला संयोजक म्हणून अविनाश राजू माळी, शुभम गायकवाड, गुलाब चिंतामन माळी, राकेश माळी, भैया माळी आदींचे सहकार्य लाभले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.