म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ध्वनिक्षेपकावरुन पोवाडे सादर करीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक भाजपचे नेते डॉ. कांतिलाल टाटिया यांनी शिवाजी महाराजांचे कार्य त्यांची राजनीति व प्रजेविषयी आस्था कथन करून छत्रपतींचा गौरव केला. सन्मित्र क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी राजाची भाषा व प्रजेची भाषा एकच असली तर ते सुराज्य होते. शिवाजी महाराजांच्या काळात असे चित्र बघावयास मिळाल्याने शिवाजी महाराज श्रीमंत योगी झाले.प्रजेच्या हिताला महाराज प्राधान्य देत. असे प्रतिपादन केले. डाॅ.कांतीलाल टाटिया व प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी महाराजांच्या शिल्प प्रतिमाचे पुजन करून माल्यार्पण केले.याप्रसंगी अजय शर्मा, प्रा. प्रदीप पाटील,प्रा. लियाकतअली सैय्यद, चतुर पाटील, मनीष चौधरी,प्रशांत कदम, मनोज राजे, हिरालाल माळी, के.के. सोनार,हनिफ कासमानी, रजेसिंग भिल, राजेंद्र महाजन,हरिष बेलदार, दिवाकर बेलदार, संतोष चत्रे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी शिवाजी महाराजांच्या शिल्प प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली. सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे शिवजयंती निमित्ताने प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या साठी विविध गटात स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिला. शहादेकर नागरीकांची संध्याकाळ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पुजन करण्या साठी उपस्थिती होती.P








