म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील
म्हसावद येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवराय रन मॅरेथाॅन व सायकल मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले.यात प.पू. सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.यात 5 किलोमीटर सायकल स्पर्धेत इयत्ता पहीलीची उत्कर्षा प्रविण पावरा हिने सहभाग घेवून स्पर्धा पुर्ण केली हे विशेष ठरले.तिच्यासह कुशल सुर्यवंशी,भुषण वसावे,भुषण गुरव यांनी सायकल स्पर्धा पुर्ण केली.10 किलोमीटर शिवराय रन मॅरेथाॅनमध्ये प्रथम क्रमांक विवेककुमार बापू महाले,द्वितीय यश धनगर तर तृतीय क्रमांक जयेश भोसले याने पटकावला.यांच्यासह सुधाकर पाटील,महेंद्र बैसाणे,आदित्य बैसाणे यांनी 10 किलोमीटर मॅरेथाॅन स्पर्धा यशस्वीरित्या पुर्ण केली.मुख्याध्यापिका सुरेखा गुजर,पर्यवेक्षिका संगीता जयस्वाल यांचे मार्गदर्शन लाभले तर क्रीडाशिक्षक सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.आर.एन.सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.