म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.पहाटेस गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीसह शौर्य दौडचे आयोजन करण्यात आले.शौर्य दौडप्रसंगी शिवरायांच्या घोषणेसह नावाचा गजर करण्यात आला.सर्व शिवप्रेमींनी प्रतिमा पुजन केले.
यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.यात 11 विद्यार्थी विद्यार्थीनींनी सहभाग घेतला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त जवान संजय सोनवणे तर प्रमुख पाहूणे म्हणून म्हसावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार,माजी उपसरपंच अंबालाल लांडगे,राहूल सुर्यवंशी,महेश जगदाळे हे होते.वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक सोमेश्वर जगदाळे,द्वितीय हर्षदा पाटील तर तृतीय क्रमांक कोमल जगदाळे हीने पटकावला. विजयी स्पर्धकांना रोख पारितोषीक,स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक बागले,सुधाकर पाटील यांनी काम केले.आदित्य बागले यांने छत्रपती शिवाजी महाराज यांची भुमिका साकारली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनवणे,पोलीस निरीक्षक पवार यांनी मार्गदर्शन केले.अशोक बागले यांनी सुत्रसंचलन केले तर आभार प्रसाद लामगे यांनी व्यक्त केले.