नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथे शासनाच्या आदेशाप्रमाणे दिव्यांगांसाठी राखीव ५ टक्क्े निधीतून जीवनावश्यक साहित्य दिव्यांग व्यक्तीना अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांच्या हस्ते लाभाचे वाटप करण्यात आले .
शिवजयंतीचे औचित्य साधून दिव्यांग बांधवांच्या सोयीनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली . कार्यक्रम ग्रामपंचायत उमर्दे खुर्दे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे न्यायाधीश डी . व्ही हरणे , तसेच मुख्य न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर नंदुरबार व ऍड. हेमंत महाजन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते . याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी सांगितले की , दिव्यांग व्यक्तीना त्यांच्या अधिकारांची जाणीव असणे हे गरजेचे आहे . शासनाच्या दिव्यांगांसाठी काल्याणकारी योजना आहेत काही स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांग हितासाठी कार्यरत असून त्या देखील दिव्यांग हिताची काळजी घेत असतात , असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले .
कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना न्यायाधीश डी . व्ही . हरणे यांनी विविध कायद्याची ओळख करून दिली . दिव्यांगांसाठी असलेल्या कायद्यांची दिव्यांगांसाठी कायद्यात विविध तरतुदी असून कोणत्याही प्रकारची कायदेशीर मदत लागल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल , असे मत व्यक्त केले , तसेच न्यायधीश आर . एन . गायकवाड यांनी द पर्सन विथ डीसॅबिलीटी ऍक्ट २०१६ या कायद्याची माहिती देवून यात विविध प्रकारच्या दिव्यांगत्वाचा समावेश करण्यात आला असून दिव्यांग बांधवांना सन्मानाची वागणूक मिळावी व सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी संरक्षण देण्यात आले असल्याची सविस्तर मार्गदर्शन केले . यावेळी ग्रामपंचायतीतर्फे गावातील एकूण १० दिव्यांग व्यक्तीना हा लाभ देण्यात आला . ग्रामपंचायतीच्या एकूण निधीतून ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव असल्याने त्यांचा लाभ दिव्यांगाना मागणीनुसार जीवनावश्यक साहित्याच्या स्वरुपात वाटप करण्यात आला . कार्यक्रमांचे सूत्रसंचलन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हा अध्यक्ष ऍड.दत्तात्रय कदमबांडे यांनी तर आभार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप बागुल यांनी केले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे , मंडळ अधिकारी श्री . पानपाटील , ग्रामसेवक भरत गुले,तलाठी किरण सूर्यवंशी ,ग्रा.पं.सदस्य श्रावण पाटील, दगेसिंग राजपूत , कैलास वळवी , कर्मचारी रवींद्र साळवे , रामा मराठे यांचे सहकार्य लाभले .यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. शेवटी आभार ऍड. दत्तात्रय कदमबांडे यांनी व्यक्त केले .