नवापूर l प्रतिनिधी
शहरातील जुने महादेव मंदीर परीसराला नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांनी ९७ लक्ष निधी मंजुर करुन दिल्या बाबतचे आदेश नवापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्याकडे दिला आहे. नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी अहिल्याबाई होळकर पासून असलेले जुने महादेवाचे मंदीर प्रभाग क्र ७ मध्ये असुन या मंदीर परीसरात संरक्षण भिंत बनविणे, मंदीर परीसरात सुशोभिकरण करणे या कामासाठी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी निधी मंजुर करुन दिला असुन या कामाचा शुभारंभ महादेवाची पुजा करुन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्षा हेमलता,पाटील, उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,प्रभाग ७ चा नगरसेविका अरुणा पाटील,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,नगरसेवक विशाल सांगळे,माजी नगरसेवक अजय पाटील,दर्शन प्रताप पाटील,विनय गावीत,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,उद्योजक रमेश अग्रवाल,हरीष पाटील,गणेश वडनेरे,सुभाष कुंभार,उज्जला वडनेरे,मंदीराचे पुजारी तुळशीराम गुरव,दर्शन दिपक पाटील,कवि सुनिल पवार,अमित पंचाल,मनोहरलाल दलाल,शिरीष शहा, यशवंत पाटील, विनायक पाटील धाकू भोई आदी उपस्थित होते.यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या सत्कार शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील व नगरसेविका अरुणा पाटील यांनी केला यानंतर आमदार नाईक यांच्या सत्कार गणेश वडनेरे यांनी शिवरायांची मुर्ती देऊन केला.या नंतर सत्कार प्रभागाचा महिला यांनी केला यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक म्हणाले की आदिवासी विकास विभागाचे मंत्री ॲड. के सी पाडवी यांनी नवापूर तालुक्यासाठी ११ कोटीचा निधी मंजुर करुन दिला आहे यातुन ९७ लक्ष महादेवाचा मंदीर शुशोभिकरण करण्यासाठी मी देत आहे.याची निविदा नगराध्यक्षा यांनी काढुन कामाला सुरुवात करावी.महादेव मंदीराचे काम होण्यासाठी माझे मागील २ वर्षा पासुन प्रयत्न सुरु होते ते आज महादेवाचा कृपेने मंजुर झाले आहे. याचा मला विशेष आनंद होत आहे.या नंतर आमदार निधी मधुन श्री स्वामी समर्थ मंदीराला पण निधी दिला आहे.त्याचे काम ही लवकरच सुरु होणार आहे.नवापूर शहरातील प्रत्येक वार्डासाठी लाईटाची सुविधा मी केली आहे.यासाठी २ कोटी मंजुर झाले असुन या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नवापूर शहर एक सुंदर शहर बनविण्याची संकल्प आहे.ते माझे स्वप्न आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.या नंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हसमुख पाटील,गणेश वडनेरे,किरण टिभे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या नंतर मंदीराला निधी उपब्लध करुन दिल्या बद्दल मंदीराचे ट्रस्टी यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या सत्कार केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शिवसेनेचे प्रविण ब्राह्मणे यांनी केले.