म्हसावद l प्रतिनिधी
19 फेब्रुवारी 2022 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शहादा तालुक्यातील फेस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सायकल रोड रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या पूर्वसंध्येला सायकल स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक के.एल.पाटील यांनी शिवप्रतिमेचे पूजन व फीत कापून केले. सायकल स्पर्धेचे आयोजन के.बी.पाटील यांनी केले. सायकल रोड रेस यामध्ये स्लो सायकल स्पर्धा व मॅरेथॉन सायकल स्पर्धा ( रोड रेस) या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या.उद्घाटनाच्या वेळी गावातील विजय भाई( पोस्टमन) ,योगेश भाई, ,महानुभाव पंथाचे सुभाष दादा ,वसंत भाई यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेत इ. 5 वी ते 7 वी 17 मुला- मुलींनी व इ. 8 वी ते 10 वी 19 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या प्रसंगी विजय पाटील (पोस्टमन) यांनी विद्यार्थ्यांना 501रुपये बक्षिस स्वरूपात दिले सायकल रोड रेस या स्पर्धेत शाळेचे सर्व सहकारी अनिल भाई, जयेशसर, परेश सर ,कुंभार सर, जयदेव सर, गायत्री मॅडम, मंजुश्री मॅडम व हेमंत कोते यांनी परिश्रम घेतले.