नंदूरबार l प्रतिनिधी
केंद्रिय क्षयरोग विभाग (सीटीडी), आयसीएमआर नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ रिसर्च ईन टिबरक्युलॉसेस (आयसीएमआर-एनआयआरटी), आयसीएमआर – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ एपिडिमोलॉजी (आयसीएमआर-एनआयई), इंडियन असोसिएशन फॉर प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (आयएपीएसएम), जागतिक आरोग्य संघटनेचे देश कार्यालय, भारत (डब्ल्यूएचओ) या संस्थांच्या सहयोगाने टिबी मुक्त भारत वार्षिक सर्वेक्षणास नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, यांच्या हस्ते रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून उपराष्ट्रीय टीबी मुक्त भारत (Sub National Certification) वार्षिक सर्वेक्षणास आज नंदुरबार जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली या वेळी क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार, जागतिक आरोग्य संस्थेचे सल्लागार डॉ. हर्षद लांडे, क्षयरोग विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्री. शिरीष भोजगुडे, नगरसेवक प्रशांत चौधरी, हाशीम शहा, शाबीर बागवान व जिल्हा क्षयरोग विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वाकांक्षी धोरण निश्चित केलेले आहे की ज्यामध्ये नवीन टीबी केसेस कमी करणे हा उद्देश्य आहे. अद्ययावत टीबी केसेसच्या आकडीवारीनुसार असे लक्षात येते की देशभर टीवीच्या प्रमाणात बऱ्याच दृष्टीने तफावत आहे.आणि जिल्हापातळीवरून टीवी दूरीकरणासाठी करण्यात येणारे प्रयत्न देखील अनेक प्रकारचे आहेत. जिल्हा किंवा राज्य “टीबी मुक्त” म्हणून दर्जा मिळविल्यास त्यांना आर्थिक किंवा आर्थिकेतर बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. (सन २०१५ पासून व एसडीजीच्या नियमांनुसार टीबी प्रसारणाचा दर ८० टक्के पेक्षा कमी गरजेचा) आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने या उपक्रमातंर्गत राज्य व जिल्हे अशा पुरस्कारासाठी दावे किंवा अर्ज मागविलेले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च – नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ एपिडिमियोलॉजी (आयसीएमआर-एनआयई) यांना जिल्हा व राज्यांनी केलेल्या दाव्याची / अर्जांची पडताळणी करण्यासाठी सीटीडीने सोपविण्यात आलेली आहे. जिल्हा व राज्यांनी केलेले दावे पडताळण्यासाठी बॅक्टेरियोलॉजिकली पॉझिटिव्ह पल्मोनरी क्षयरोगाचे प्रसारणांचा अंदाज घेणे व पूर्वी समाजात आणि सदयस्थितीत एटीटी अंतर्गतही पडताळणी हा या मागचा उद्देश आहे.