म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील महेंद्र बैसाणे यांची नंदुरबार जिल्हा एम. एड् कृती समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सदरील बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील एम. एड् व एम. ए. एज्युकेशन धारक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये महेंद्र बैसाणे यांची सर्वानुमते नंदुरबार जिल्हा एम. एड् कृती समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यासाठी राज्य सल्लागार सुरेश भावसार, अखिल राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील, अखिल जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारिया, सरचिटणीस अशोक देसले, कोषाध्यक्ष किशोरजी चौधरी, जिल्हा उपसरचिटणीस उमेश कोळपकर, व अखिल जिल्हा पदाधिकारी तसेच शहादा अखिल तालुका अध्यक्ष महेंद्र चौधरी, शहादा तालुका सरचिटणीस रविंद्र बैसाणे यांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या कार्यास यश मिळावे.
सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य एम.एड कृती समितीचे राज्य संघटक गुलाब राठोड यांनी निरीक्षकाची भूमिका पार पाडली. यावेळी इब्टा संघटनेचे विभागीय अध्यक्ष दादाभाई पिंपळे, प्रकाश भामरे, सुरज नगराळे, वंदना पानपाटील, प्रवीण शिंदे, सुरेश कुवर, भिमराव मोरे, जितेंद्र सोनवणे, विक्रम मोहारे, राहुल चौधरी व जिल्ह्यातील एम. एड. पात्रताधारक शिक्षक उपस्थित होते.