तळोदा | प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय शहादा येथील कृषिदूत दि.५ जुलै पासून गावोगावी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करीत आहेत.
कृषिदूत हे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले मोहम्मद अब्दुलहुसेन बद्री यांनी तळोदा तालुक्यातील रोझवा येथे शेत शिवारात जावून शेतकऱ्यांना पीक पद्धती व वित्त पुरवठा याबाबत माहिती दिली. आधुनिक पीक लागवड पद्धती व शेतीला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांची कार्यपद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. शेतीसाठी उपयुक्त असलेले अप्लिकेशन व इतर तांत्रिक बाबींचीही माहिती यावेळी शेतकर्यांना दिली. या अॅपवर लागवड, तंत्रज्ञान, आधुनिक शेती, वित्त पुरवठा, बाजार आदींची माहिती घर बसल्या मिळते. शेतकरी याद्वारे आपली शेती नफ्यात आणू शकतील. शेतीत बदल घडवू शकतील असे कृषिदूत मोहम्मद अब्दूलहुसेन बद्री यांनी सांगितले. कीड व्यवस्थापन, हवामानाचा अंदाज, पाणी, खतांचे व्यवस्थापन, बाजारभाव, तंत्रज्ञान या सर्वच बाबी शेतीसाठी महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने काम केले पाहिजे असे शेतकऱ्यांना सांगितले.
यावेळी प्रगतिशील शेतकरी रमेश वेडुजी मराठे, सचिन चुडामन मराठे, अमृत रमण मराठे, मनोज सुदाम पाटील, भगवान तुकाराम मराठे, भूषण भिमराव मराठे, कैलास राजाराम मराठे, प्रमोद सदाशिव पटेल, गोमा पाडवी आदी शेतकर्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी शहादा कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, डॉ.ए.बी.पाटील, संदीप पाटील, सी.यु.पाटील, एम.ए.कोळी. व्ही.एन. पाटील आदी शिक्षकांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.