नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती डी आर हायस्कूल येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पूर्वसंध्येला साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पिंपळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून उपमुख्याध्यापक नारायण भदाणे, पर्यवेक्षक पंकज पाठक, श्रीराम मोडक उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण केली. यावेळी शाळेचे उत्सव समिती प्रमुख राजेंद्र लांडगे यांनी प्रास्ताविकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगाला उजाळा दिला. मान्यवरांनीही छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंट गुरु होते, त्यांचे नेतृत्वगुण, गनिमी कावा, सर्वांना सोबत घेऊन चालणे हे गुण आजच्या पिढीसाठी सुद्धा अत्यावश्यक असल्याचे म्हटले.कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बी एड चे प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. कोरोना सदृश्य नियमांचे पालन करून सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.








