पुणे –
2020-21 या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळं रद्द कराव्या लागल्या होत्या. यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याची घोषणा बोर्डानं केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं सावटातून हळू हळू मुक्त होत असताना यावेळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं यंदा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दहावी आणि बारावीची प्रवेशपत्र शाळा आणि महाविद्यालयात देण्यात येत होती. बारावीची प्रवेशपत्र देण्यास यापूर्वी सुरुवात झालेली आहे. दहावीची प्रवेशपत्र (SSC Admit Card) आजपासून देण्यात येणार आहेत.








