तळोदा l प्रतिनिधी
नंदूरबार येथे नॅशनल गल्स माध्यमिक स्कूल नंदूरबार येथे जिल्ह्यातील शालेय ग्रंथापालांची सभा संपन्न झाली.
या सभेच्या अध्यक्ष स्थानी ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील हे उपस्थित होते. त्याचबरोबर संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजर होते.सभेमध्ये प्रामुख्याने अनेक वर्ष्यापासून रखडलेल्या ग्रंथापालांची प्रमुख समस्या अर्धवेळ सेवा ही होय अर्धवेळ ग्रंथापाल पूर्णवेळ कसे होतील याच समस्येवर सभेत चर्चा करण्यात आली.शासन स्तरावर ही समस्या निराकरण करणेसाठी विविध संघटनेमार्फत शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक ग्रंथापालाला आवश्यक असणारी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.त्यासाठी सर्वांनी त्याची पूर्तता करावी असे सर्वानुमते ठरले.या बैठकीसाठी ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,प्रकाश जोहरी,दिपक गोसावी,मंगेश उपासनी,कैलास पाटील, शांताराम पाटील,रविष बैरागी,अबरार बसिद, झाकीर काझी,संजय धोबी,काझी सज्जाद, कैलास पाटील,आशा पाटील,संगीता टेम्भेकर,मुकेश पाटील आदी उपस्थित होते.








