तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरातील संत रोहिदास नगरात चर्मकार नवयुवक मंडळ व सी. आर. बाईज ग्रुपतर्फे संत रोहिदास महाराज जयंती कोरोना नियमाचे पालन करीत साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास समाजाचे जेष्ठ नागरिक धरमदास शंकर आहिरे यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. हेमंत सूर्यवंशी यांनी महाराजांचे जीवन चरित्र व कथा आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमास सूत्रसंचालन हेमंत सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमास समाजबांधव, महिला उपस्थित होत्या