नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वेपुलाचे काम सुरू असल्याने रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक दि. १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत बंंद करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार ते नळवा रस्त्यावरील वरील रेल्वे पुल क्र . १८८ जवळील कि.मी. १५५/११-१२ वरील रोडवरील रेल्वेपुलाचे कामानिमित्ताने दि. १७ ते १९ फेब्रुवारी पर्यंत सदर रेल्वेपुलाखालील मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामार्गावरील वाहतुक इतरत्र मार्गावरून वळविण्यात आली आहे.यामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने त्यावरील वाहतूक वरील व इतरत्र वळविणेबाबत रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येवून योग्य तो बंदोबस्त व बॅरेकेटींग करण्यात यावा . रेल्वे प्रशासनाने सदर रेल्वे रूळाचे दुरूस्तीचे काम उक्त विहित केलेल्या मुदतीत काम पुर्ण करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिले आहे.