अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथील कालिका माता यात्रेला १०० वर्षांची परंपरा लाभली आहे.या यात्रेला काल पासून सुरुवात झाली असून सवाद्य तगदरावांची मिरवणूक काढून विधीवत पूजा करण्यात आली.
माघ शुद्ध पौर्णिमेपासून भरणाऱ्या सोरापाडा (अक्कलकुवा) येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवाला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला. या यात्रोत्सवाला जुनी परंपरा लाभली असून हा यात्रोत्सव १०० वर्षांची परंपरा आहे. १९ फेब्रुवारी १९२० रोजी महाकाली मातेची पहिली यात्रा भरविण्यात आली होती.16 फेब्रुवारीला सायंकाळी अक्कलकुवा परिसरातील गंगापूर, ठाणाविहीर, खटवानी, जामली, मिठ्याफळी येथील नागरिक सवाद्य तगदरावांची मिरवणूक काढून विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेच्या प्रारंभी श्री. महाकालिका देवीच्या प्रथम आरतीचा मान काठी संस्थांनच्या वारसदारांना दिला जातो. यात्रेनिमित्त मंदिरात विधिवध पूजन करुण रथ अक्कलकुवा शहराच्या मुख्य मार्गत फिरवून यात्रेला प्रारंभ करण्यात आला.