नंदुरबार l प्रतिनिधी
येथील नंदुरबार शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीतर्फे वृक्षरोपण करुन वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रूपालीताई चाकणकर याच्या आदेशानुसार तसेच निरीक्षक मीनाक्षीताई व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार महिला आघाडी शहराध्यक्षा सौ.उषाताई तायडे यांनी वृक्षारोपण करुन वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महिला आघाडीच्या हंसा आहीरे, कांचन मोरे, संगीता पाटील, तुलसी गुजराथी, मोनिकाताई, वंदनाताई, सोनलताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.