नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हा यांच्या वतीने पक्ष कार्यालय येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते अन्नदान वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा चिटणीस जितेंद्र कोकणी, नंदुरबार शहर अध्यक्ष नितीन जगताप,नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश भोई,महिला शहराध्यक्ष उषाताई वळवी, जिल्हा चिटणीस महिला हंषाताई अहिरे,जिल्हा सदस्य कंचन मोरे,युवक शहराध्यक्ष लल्ला मराठे, ओबीसी जिल्हा समन्वयक निलेश चौधरी,शहर उपाध्यक्ष पंकज पाटील,पवन राजपुत,रुपेश जगताप,स्विय सहाय्यक रविंद्र जावरे,आदि पदाधिकारी उपस्थित होते.