नंदूरबार l प्रतिनिधी
भारत हा तरुणांचा देश आहे .या तरुणांच्या इच्छाशक्तीवर देशाची प्रगती अवलंबून आहे .जगा बरोबरच भारतावर आलेला कोरोनासारख्या महाभयंकर काळात याचं तरुणांनी स्वताला झोकून देत समाजाला अभिमान वाटावा असे काम केले आहे. युवाशक्ती ही विधायक शक्ती आहे. असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांनी “रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेच्या” उद्घाटन प्रसंगी केले.
कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जी .टी. पाटील महाविद्यालय यांच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने नुकतीच “रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा” जीटी पाटील महाविद्यालयाच्या व्ही. एल. सी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांनी केले. त्यावेळी त्यांनी विविध महाविद्यालयातील तरुणांसमोर वरील प्रतिपादन केले .या वेळी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. तर या योजनेत सहभागी झालेल्या युवकांनी समाजासाठी विधायक उपक्रमासाठी सज्ज राहावे असे आवाहनही केले. रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळेच्या निमित्ताने फुलंब्री तालुका फुलंब्री येथील संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुरेश मुंढे यांनी रॅगिंग प्रतिबंध कायदा आणि अंमलबजावणी ,महाविद्यालयीन जीवनामध्ये व समाजव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग अर्थात छळवणुकीच्या बाबत वेगवेगळी उदाहरणे देऊन आपले विचार मांडले .तर प्राचार्य डॉ व्ही. एस. श्रीवास्तव यांनी अध्यक्षीय समारोप केला .
तत्पूर्वी उपप्राचार्य डॉ. एम. जे. रघुवंशी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले .यावेळी व्यासपीठावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक पाटील, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉमोहन पावरा, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी ,नंदुरबार जिल्हा समन्वयक प्राचार्य एस. बी. पाटील ,जळगाव जिल्हा समन्वयक पवन पाटील, धुळे जिल्हा समन्वयक प्रा डॉ शेख आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी विकास विभागाचे अधिकारी डॉ.माधव कदम यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर महिला कार्यक्रम अधिकारी जयश्री नायका यांनी आभार मानले .तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. रूपेश देवरे ,डॉ मनोज शेवाळे यांनी परिश्रम घेतले .यावेळी विधी महाविद्यालय, शिक्षण शास्त्र महाविद्यालय ,जी.टी. पाटील महाविद्यालय यांच्यासह अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.