नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथे जि.प.उपोषण दरम्यान तब्बेत खालावल्याने पोलीस रूग्णालयात घेवुन जात असतांना पोलीसांचे कर्तव्यात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ व मारहाण करणार्या महिला आरोपीतांना न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी पासुन जिल्हा परिषद कर्मचारी सुरेखा आधार बोरसे ही आमरण उपोषणासाठी बसलेली होती . त्या दिवशी त्या ठिकाणी फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बबिता नुरजी देसाई व कलावती वसावे अशांना डयुटी बंदोबस्त रात्री ८. वाजेपासुन लावण्यात आलेला होता . त्याचवेळेस नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोनि नितीन चव्हाण हे देखील त्यांच्या पोलीस स्टापसह हजर होते . जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री . बागुल व त्यांचे सहाय्यक श्री . पाटक व पोनि नितीन चव्हाण असे जिल्हा परीपद आवारात उपोषणकर्ती महिला सुरेखा आधार बोरसे हिस उपोषण सोडणेबाबत व तिला निलंबित केल्याचे कारण समजावून सांगत असतांना सुरेखा बोरसे हिने मी उपोषण सोडणार नाही असे सांगुन टोमणे मारत होती . सुरेखा आधार बोरसे हिची तब्बेत खालावल्याने तिला श्री . बागुल यांनी वैद्यकीय उपचार घेण्याबाबत विनंती केली असता,तिने उपचारास देखील नकार दिला होता . सिव्हील हॉस्पीटल येथील वैद्यकीय अधिकारी यांना जागेवरच बोलावुन सुरेखा हिस तपासले असता डॉक्टरांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याबाबत तेथे उपस्थित असलेल्या अधिकार्यांना सल्ला दिला होता . उपोषण सोडण्यास व रुग्णालयात दाखल होण्यास सुरेखा हिने नकार दिल्याने तिला उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदारांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता , त्याच वेळेस सुरेखा आधार बोरसे हिची मुलगी हर्षदा सुधीर पाटील व आई कोकीळा आधार बोरसे यांनी पोलीसांना मज्जाव करत पोनि चव्हाण यांच्या अंगावर मारण्याच्या उद्देशाने धावत येवुन वाईट वाईट शिवीगाळ केली होती . तसेच हर्षदा पाटील हिने मोबाईल मध्य पोलीसांची व्हीडीओ शुटींग करत खोटया तक्रारी करण्याच्या धमक्या दिल्या होत्या . नंतर हर्षदा पाटील व कोकीळा बोरसे यांना ताब्यात घेवून पोलीस गाडीत बसवितांना हर्षदा पाटील हिने फिर्यादी महिला पोलीस अंमलदार बबिता नुरजी देसाई यांना वाईट वाईट शिवीगाळ करत चापटीने मारुन , उजव्या हातास चावा घेत ९ ते १० गोळया घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता . वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषणकर्ती आरोपी महिला सुरेखा आधार बोरसे हिची प्रकृती अधिक खालावु शकते असे पत्र दिल्याने तिला बळाचा वापर करत शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारकामी दाखल केले होते . अश्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वरील तिनही महिला आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर खटल्याची सुनावणी अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार आशुतोष भागवत यांचे कोर्टात होवुन आरोपी सुरेखा आधार बोरसे, हर्षदा सुधीर पाटील,कोकीळा आधार बोरसे सर्व रा.वावद ता . जि . नंदुरबार यांच्याविरुद गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने भा.द.वि.क. ३५३,३५ ९ , ३४ अन्वये सुरेखा बोरसे हिस ६ महिने साधा कारावास व एक हजार रुपये दंड, कोकीळा बोरसे हिस १ महिना कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे . हर्षदा सुधीर पाटील हिची शिक्षा जिल्हा परीविक्षा अधिकारी यांच्या कार्यालयातुन अहवाल सादर केल्यानंतर ठोठावण्यात येणार आहे . वरील गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस निरीक्षक एस . आर . मथुरे यांनी सादर केले होते . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ऍड . वी . यु . पाटील यांनी पाहिले.सदर खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साळवे व पोना गिरीश पाटील यांनी कामकाज केले.