शहादा तालुक्यातील शहाणा येथे ऊसतोडसाठी कोयते पुरविण्याचे सांगुन ६ लाख ३० हजाराची फसवणुक केल्या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.१९ ते २१ ऑक्टोंबर २०२१ दरम्यान शहादा तालुक्यातील शहाणा गावाजवळील शिवारात रामसिंग मिठ्या पाडवी याने साईदास गणपत वंजारी याचा विश्वास संपादन करुन गोड बोलुन ऊस तोडणीसाठी कोयते पुरविण्याचे सांगुन त्यापोटी त्यांच्याकडुन ग्राहक सेवा केंद्रातुन १ लाख ३० हजार रु व दि . २१ऑक्टोंबर २०२१ रोजी ५ लाख रुपये असे एकुण ६ लाख ३० हजार रूपये घेवुन आज पर्यंत पैसे परत न करता फसवणुक केल्याप्रकरणी साईदास गणपत वंजारी रा. कुर्हाड तांडा,ता.पाचोरा (जि.जळगाव) यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात रामसिंग मिठ्या पाडवी, बिज्रलाल जेगा रावताळे, दिलीप आलमसिंग चौधरी तिन्ही रा.प्रिपाणी,ता.शहादा यांच्या विरूध्द भादवि क.४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई माया राजपुत करीत आहेत.