Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

team by team
February 12, 2022
in राजकीय
0
कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील नुकतीच ग्रामपंचायत कार्यालयात ग्राम सभा घेण्यात आली होती येथील ग्राम पंचायतची कार्यकाळ संपल्यामुळे येथे प्रशासक नेमले आहे. तरी येथील ग्राम सभा वेळी घरकुलची ड यादीचे वाचन यावेळी करण्यात आले तेव्हा ग्रामस्थांना धक्काच बसला यादीत चक्क 300 लाभार्थ्यांचे नावे या ड यादीतून अपात्र ठरविण्यात आले. त्यात लाभार्थ्यांच्या घरात लँडलाईन नसतांना घरात लँडलाईन फोन दाखवण्यात आले आहेत. कच्चे घर पक्के दाखवण्यात आले आहेत. घरात मोटर सायकल व चारचाकी वाहन नसतांना देखील मोटर सायकल व चारचाकी दाखवून अपात्र ठरविण्यात आले आहे. अश्या खोट्या वस्तू दाखवून असा सर्वे कोणी केला आणि कसा केला गेला याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी ग्रामस्थांनाकडून होत आहे. कोंढावळ हे गाव खासदार यांनी दत्तक घेतले असून या दत्तक घेतलेल्या गावात असा प्रकार घडतोच कसा सबंधित अधिकारी यांनी चुकीचा सर्वे केला कसा आणि कोणाच्या सांगण्यावरून केला हे मात्र प्रश्न अनुत्तर आहे .या बेजबादार अधिकाऱ्यांनी असा चुकीचा सर्वेक्षणामुळे 300 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागणार आहे याला कोण जबाबदार या बाबत गावात मात्र तर्क वितर्क लावले जात आहे.
या बाबत दि 8 फेब्रुवारी रोजी सकाळी अपात्र ठरलेले 300 लाभार्थी संबधित पंचायत समिती शहादा येथील गटविकास अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्या कडून समाधान कारक उत्तर मिळाले नाही .म्हणून हे लाभार्थी व ग्रामस्थ थेट नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सिमा वळवी यांना लाभार्थ्यांनी निवेदन देऊन आपल्या समस्या सांगितल्या व असा खोटा आणि चुकीचा सर्वेक्षण कसा केला असावा आणि कोणाच्या सांगण्यावरून केला असावा किंवा एका च ठिकाणी बसून हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे यावेळी लाभार्थ्यांचे म्हणणे आहे.तरी संबधित प्रकारचा योग्य चौकशी करून 300 वंचित लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरकुलांचा लाभ मिळावून द्यावा अशी मागणी यावेळी लाभार्थ्यांनी केली आहे. येत्या 8 दिवसात या ड यादीतील घरकूल लाभार्थ्यांना पात्र ठरविण्यात यावेत अन्यथा या 300 अपात्र ठरविण्यात आलेले लाभार्थी व गावातील ग्रामस्थ आमरण उपोषण करणार. सर्वस्वी जबाबदार संबधित अधिकारी असतील असा इशारा यावेळी अपात्र लाभार्थी व ग्रामस्थ यांनी केला आहे.सदर
या निवेदनावर समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद ईश्वर अहिरे ,महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष दिपक आनंदा अहिरे, कोंढावळ गणाचे पंचायत समिती सदस्य गुपसिंग इंदास पावरा ,भगवान साधू माळी, सेनु रामा भील ,भरत भील, प्रविण आत्माराम माळी, रमेश गोकुळ माळी ,अशोक भगवान अहिरे, रमेश चींधा माळी, काशिनाथ प्रकाश माळी ,मंगा रामा भील, अजन सजन भील, रोहिदास शामराव अहिरे, माचिंद्र रामदास माळी, लालचंद हिलाल माळी, शिवाजी बबनराव पवार , गजानन दगा माळी, चंदर शेणू भील, नंदाबई बबन पवार, पंडित नथा माळी ,अर्जुन मका शेवाळे, संजय बन्सीलाल पटेल ,योगेश निंबा माळी, अभिमान बन्सीलाल गोसावी, भिका निरजन गोसावी ,सुरेश जयराम वाल्हे ,अनिल साहेबराव माळी, धरमसीग करमसिंग भील, सुरेश हिलाल वाल्हे ,धनराज रमेश माळी, न्हानु शेणु भील ,सचिन रविंद्र पवार, पंकज हिरामण माळी आदी लाभार्थ्यांच्या व ग्रामस्थांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

Next Post

तळोदा आदिवासी प्रकल्प विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटपात राज्यात ठरला अव्वल

Next Post
तळोदा आदिवासी प्रकल्प विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटपात राज्यात ठरला अव्वल

तळोदा आदिवासी प्रकल्प विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वाटपात राज्यात ठरला अव्वल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add