Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

team by team
February 12, 2022
in राज्य
0
‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखा : हिंदु जनजागृती समिती

नंदुरबार l प्रतिनिधी
१४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाईनला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कोणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. ‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्याचारांपासून स्वतःच्या पाल्यांना वाचवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केले आहे. समितीच्यावतीने जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक,शिक्षण अधिकारी तसेच शहरातील शाळा व महाविद्यालय याच्या प्राचार्य व मुख्याध्यापक असे ११ ठिकाणी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, समिती या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने देणे, पत्रकांचे वितरण करणे, शासनाकडे निवेदन देणे, सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसार करणे आदींद्वारे जागृती करत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आपण पाश्‍चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करत आहोत. हिंदूंचे सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात. आपली समृद्ध संस्कृती सोडून अन्य धर्मातील प्रथा-परंपरांचे पालन करणे, हे एकप्रकारे आपले मानसिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या धर्मांतरच नव्हे का ? यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ची कुप्रथा रोखा अन् हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा’, असे आवाहन समितीने केले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्याची कारणे
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी अपराध घडतात; तसेच मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदीही वाईट कृत्ये केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ७ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत गर्भनिरोधाच्या (कंडोमच्या) विक्रीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होते, तसेच गर्भनिरोधक औषधे आणि गर्भधारणा तपासणी संच (प्रेंग्नन्सी टेस्ट कीट) यांच्या विक्रीतही वाढ होते, याव्यतिरिक्त लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, कुमारीमाता बनणे आदी गंभीर समस्याही निर्माण होत आहेत.
देशात महिलांवरील अत्याचारांत होणारी प्रचंड वाढ पाहता या दुष्परिणामांकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला हवे.
हिंदु संस्कृती ही सर्व प्राणीमात्रांवर सदासर्वकाळ प्रेम करण्यास शिकवते, तर ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे एका दिवसापुरते प्रेम करायला शिकवतात. यातून युवापिढी व्यापक न होता संकुचितच होत आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’चे स्तोम वाढण्यामागे विदेशी आस्थापने आहेत. युवापिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे मार्केटिंग करून गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे.
रशिया आणि अमेरिका खंडातील काही देश, तसेच चीन, इटली, स्वीडन, नॉर्थ कोरीया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; तर पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, मलेशिया या इस्लामी देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा केला, तर कडक शिक्षांची तरतूद आहे. मग ‘आपण हा दिवस का साजरा करत आहोत’, याचा विचार करायला हवा.
प्रेम आणि वासना यांतील अंतर हिंदु संस्कृती सांगते, तर वासनेलाच प्रेम समजणारी पाश्‍चात्त्यांची परंपरा आहे. ही शिकवण आज या दिवसाच्या माध्यमातून भारतीय युवापिढीत वाढत चालली आहे. जी अत्यंत घातक आहे.
या सेवेत हिंदु जनजागृती समिती चे सतीश बागुल राहुल मराठे व धर्म प्रेमी गौरव धामणे आकाश गावित जितेंद्र मराठे चेतन पाटील यांचे सहकार्य लाभले .

 

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील मानवतस्करी रोखण्याकरीता उपाययोजना करा, नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे महिला आयोग प्रदेशाध्यक्षांना निवेदन

Next Post

कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

Next Post
कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

कोंढावळ येथील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकूलच्या ड यादीतील 300 लाभार्थ्यांचे नावे अपात्र, अपात्र लाभार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add