नंदुरबार l प्रतिनिधी
येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मा बेटी गार्डनमध्ये दशामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज रविवारी करण्यात येत आहे. यावेळी वेद मंत्रोच्चारात पूजाविधी करण्यात येणार आहे.
विजयादशमीच्या मुहूर्तावर शहरातील माँसाहेब मीनाताई ठाकरे मा बेटी गार्डनचे उद्घाटन करण्यात आले होते. त्याप्रसंगी भाविक महिलांनी गार्डनमध्ये दशा मातेचे मंदिर असावे अशी भावना नगराध्यक्ष सौ. रत्ना रघुवंशी यांच्याजवळ व्यक्त केली होती. त्यानुसार, शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून मन शांती स्वास्थ्यासाठी गार्डन मध्ये दशा मातेचे मंदिर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला.
उद्या रविवार (दि.13) सकाळपासूनच विधीवत धार्मिक पूजा विधी केली जाणार आहे त्यानंतर दशामाता मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. यजमान मोहितसिंग राजपूत व अविनाश माळी यांच्या हस्ते सपत्नीक पूजा विधी करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.








