Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन

team by team
July 23, 2021
in राष्ट्रीय
0
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 11 भाषांत ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चे आयोजन
नंदुरबार ! प्रतिनिधी
 राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना धर्मसंस्थापनेचे कार्य याच ‘गुरु-शिष्य’ परंपरेने केले आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या आणि आर्य चाणक्यांनी सम्राट चंद्रगुप्ताच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले अन् आदर्श अशा धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची स्थापना केली. सध्याही समाज, राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती दयनीय झाली आहे. अशा वेळी जनतेचा छळ करणार्‍या लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लढणे आणि रामराज्यासारख्या ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे ही काळानुसार श्रीगुरुसेवाचा आहे. या उद्देशाने 23 जुलै 2021 ला सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोना महामारीमुळे यंदा ऑनलाईन कार्यक्रम होणार आहेत.
     मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु, तमिळ, पंजाबी, बंगाली, ओडिया आणि मल्याळम् या 11 भाषांमध्ये 23 जुलैला ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सवांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या महोत्सवांत श्रीगुरुपूजन, सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा संग्रहित भाग, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके (बचाव आणि आक्रमण), आपत्काळाच्या दृष्टीने करावयाची सिद्धता (चलचित्र), तसेच आत्पकाळात हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना याविषयी वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे.
    गुरु म्हणजे काय, गुरुंचे जीवनातील महत्त्व, गुरुकृपा कार्य कशी करते, त्यासाठीचे मार्गदर्शन या महोत्सवात होणार आहे. सध्याच्या महामारीच्या आपत्काळात दैवी बळाची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे या महोत्सवात सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेल, तसेच हिंदूंचे धार्मिक संघटनही होईल. तरी सर्व राष्ट्र आणि धर्मप्रेमी हिंदूंनी सहकुटुंब ऑनलाईन ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ करून घ्यावा, तसेच आपले मित्र-परिवार, परिचित, नातेवाईक यांनाही याचे निमंत्रण द्यावे, असे आग्रहाचे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
     मराठी भाषेतील ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा 23 जुलैला सायंकाळी 7 वाजता होणार असून तो ‘यू-ट्यूब’वर पहाता येईल. त्याच्या लिंक्स पुढीलप्रमाणे :
1. Youtube.com/SanatanSanstha
2. www.sanatan.org/mr/
     सनातन संस्थेच्या संकेतस्थळावरील पुढील ‘लिंक’वर अन्य भाषांमधील गुरुपौर्णिमा महोत्सवांविषयी अधिक माहिती देण्यात आली आहे – https://www.sanatan.org/mr/gurupurnima
बातमी शेअर करा
Previous Post

अपेक्षित पर्जन्यमान न झाल्यास मका, तुर व बाजरी पिकाची पेरणी करण्याचे आवाहन

Next Post

पावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान महावितरणचे नागरिकांना आवाहन

Next Post

पावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान महावितरणचे नागरिकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add